मुंबई : 'झी मराठी' वाहिनीवरील 'होणार सून मी या घरची' मालिकेमधून घरा-घरात पोहचलेला अभिनेता शशांक केतकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. कधी अभिनेता त्याच्या पर्सनल लाईफमुळे तर कधी अभिनेता त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी थोडा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नुकतीच शशांकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने एक मोठी अपडेट त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ही गुडन्यूज अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजवर त्याने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा माध्यमातून शशांक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतीच शशांकने एक गुडन्यूज त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे. ‘स्कॅम २००३’या तेलगी घोटाळ्यावर आधारित सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या शशांकने नुकतीच त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी बातमी शेअर करत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. स्कॅम २००३’या सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं कौतुकही प्रेक्षकांकडून करण्यात आलं होतं. 


शशांक लवकरच निर्माता करण जोहरची निर्मीती असलेली ‘शो टाइम’ या आगामी वेबसिरीजमध्ये शशांक महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ८ मार्चपासून हॉटस्टारवर ‘शो टाइम’ ही वेबसिरीज तुम्हाला पाहता येणार आहे. शशांकने याविषयी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''८ मार्चपासून हॉटस्टारवर ‘शो टाइम’ पाहायला विसरू नका. जेव्हा मी धर्मा प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो तेव्हाच जाणवलं ‘कुछ कुछ होता है’ माझी भूमिका लहानशी आहे पण, प्रेक्षकांसाठी ही भूमिका नक्कीच लक्षवेधी ठरेल.''


सध्या शशांक स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेत अक्षय या भूमिकेत दिसत आहे. शो टाइम सीरिजमध्ये शशांकसोबत मौनी रॉय, श्रिया सरन, इमरान हाश्मी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल यांसारखे दिग्गज कलाकार एकत्र झळकणार आहेत. सध्या त्याने ही बातमी शेअर करताच सगळीकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. 


एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, मनापासून अभिनंदन. तुमचं नवीन काम पाहण्यासाठी खूप खूप उत्सुक आहोत. शशांक मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, शशांक तुझे मनापासून खूप खूप खूप अभिनंदन आणि तुझी नवीन कामे बघण्यासाठी वाट बघते .आणि तुला नवीन नवीन कामे भर भरून मिळत राहो.आणि शशांक टॉपला पोहोचू दे. तर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.