कोची: मिस केरळ 2019 आणि दक्षिण भारत 2021 ची विजेती अन्सी कबीर आणि मिस केरळ 2019 ची रनरअप  अंजना शाहजहान यांच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत चालले आहे. यापूर्वी दोन्ही मॉडेल्सचं निधन रस्ते अपघातात झाल्याचं सांगण्यात आलं पण हा अपघात नसून हत्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्या येत आहे. विशेषत: हॉटेल मालकाने व्हिडीओ फुटेज गायब केल्याने याकडे अपघातापेक्षा हत्या म्हणून जास्त पाहिले जात आहे.
 
1 नोव्हेंबर रोजी अन्सी कबीर आणि अंजना शाहजहान कारने कोचीहून परतत होत्या. यादरम्यान महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोघींचा जागीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉडेल्ससह कारमध्ये दोन पुरुष देखील उपस्थित होते, त्यापैकी एकाचा त्याच रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला हा केवळ अपघात असल्याचे मानले जात होते, मात्र पोलिसांच्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे या मॉडेल्सच्या हत्येचा संशय अधिक गडद झाला.


या दोन्ही मॉडेल्सनी कोचीमधील '18 हॉटेल'मध्ये डीजे पार्टीला हजेरी लावली होती. येथून परतत असताना रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता त्या दिवसाचे फुटेज गायब असल्याचे आढळून आले.


अखेर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हॉटेल मालक रॉय व्हायलेटने फुटेज असलेली डीव्हीडी गायब केली. यानंतर पोलिसांनी रॉय यांना डीव्हीडी सादर करा अन्यथा कारवाईसाठी तयार राहण्याचा इशारा दिला. हॉटेल मालकाने मंगळवारी हरवलेली डीव्हीडी पोलिसांना दिली, परंतू आणखी एक डीव्हीडी देखील हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.


याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत हॉटेल मालकासह सहा जणांना अटक केली आहे. रॉय व्हायलेटवर सध्या पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. मात्र, हॉटेल मालकाने त्याला गायब करायला लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


अन्सी कबीरच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच हॉटेल मालकावर संशय होता. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यानंतरच सत्य बाहेर येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. रॉय व्हायलेटचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्यानंतर या प्रकरणात त्याचा सहभाग असण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत सध्या काहीही सांगितलेले नाही.