मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेट ही दोन्ही क्षेत्रं ऎकमेकांच्या  हातात हात घालून चालतात हे अनेकदा बघायला मिळालं आहे. अनेक अभिनेत्री आणि क्रिकेट खेळाडूंचे अफेअर आणि लग्न चर्चेत राहिलीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरची तर जोरदार चर्चा सुरू असते. अशात आता एका नव्या जोडप्याची चर्चा रंगली आहे.  


अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि हार्दिक पंड्या यांच्यातल्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू होती. या दोघांत रिलेशनशीप सुरू आहे किंवा नाही हे काही स्पष्ट झालेलं नाही. या दोघांनी अजूनतरी तसं जाहीरपणे कबूल केलं नाही. पण परिणीतीने या अफवांवर स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तिने या चर्चांना थांबवलं आहे. 



परिणीतीने एका सायकलचा फोटो शेअर करत टि्वट केलं होतं. या ट्विटमध्ये तिने असं म्हटलं होतं की, 'सर्वात शानदार पार्टनरसोबत परफेक्ट ट्रिप'. या टि्वटला हार्दिक पंड्याने उत्तर दिलं होतं. त्याने लिहिलेलं की, 'परिणीती मी ओळखू का? मला वाटतं क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये आणखी एक लिंक तयार होणार आहे. तुम्ही फोटो मात्र छान काढलाय.' यावर परिणीतीने उत्तर दिलं की 'हा हा हा.. असेल आणि नसेलही. हिंट या फोटोतच आहे.' यानंतर सोशलवर या दोघांमध्ये काही सुरू असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. पण आता परिणीती या अफवा असल्याचं म्हणतेय.