Welcome To The Jungle: 2025 हे वर्ष मनोरंजन चित्रपटांनी भरलेले असणार आहे. कारण या वर्षात अनेक कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ज्यामध्ये 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचा देखील समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. काही महिन्यापूर्वी या चित्रपटाचे भारतातील काही ठिकाणी शूटिंग पूर्ण झाले आहे. आतापर्यंत चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झालं असून बाकीचे शूटिंग हे एका खास ठिकाणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक अहमद खान यांच्या 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाचे पहिले शूटिंग मुंबई आणि काश्मीर अशा ठिकाणी झाले आहे. हे शूटिंग ऑगस्टमध्येच पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील सर्व कलाकार हे या चित्रपटाचे पुढील शूटिंग पूर्ण करण्यासाठी दुबईमध्ये जाणार आहेत. असं म्हटलं जात आहे की, 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग दुबईतील सर्वात खास ठिकाणी होणार आहे. जिथे आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग झाले नाही आणि परवानगी देखील त्यांना मिळाली नाही. या चित्रपटाचे शूटिंग  फेब्रुवारी 2025 मध्ये सुरु होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची टीम या खास ठिकाणाच्या परवानगीसाठी प्रयत्न करत होती. 


दुबईतील या ठिकाणी होणार चित्रपटाचे शूटिंग 


बेस इंडस्ट्रीज ग्रुपच्या या चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात 34 कलाकार आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जैकलीन फर्नांडिस, रवीना टंडन, आफताब शिवदासानी, जॉनी लीवर, दिशा पाटनी यांच्यासारखे  अनेक कलाकार या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या दुबईमधील शूटिंग संदर्भात बोलताना दिग्दर्शकांनी सांगितले की, अबू धाबीमध्ये आम्ही चित्रपटाचे शूटिंग करणार आहोत. प्रेक्षक या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. त्यासोबतच  या ठिकाणी जाण्यासाठी अनेक दिवसांपासून आमची टीम देखील प्रचंड उत्सुक आहे. या चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला आहेत. 


हॉलिवूड चित्रपटांना देखील मिळाली नाही परवानगी


फिरोज नाडियाडवाला म्हणाले की, लवकरच ते दुबईतील शूटिंग सुरु करणार आहेत. चित्रपटातील अॅक्शन सीन, गाणी आणि इतर अनेक सीन या ठिकाणी शूट करण्यात येणार आहेत. यामध्ये दुबईतील अनेक लोक चित्रपटात असणार आहेत. त्यासोबत ते म्हणाले की, ज्या ठिकाणी हे शूटिंग होणार आहे त्याठिकाणी याआधी हॉलिवूड चित्रपटांना देखील शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली नाही.