मुंबई : देशसेवेसाठी भारतीय जवान नेहमी तत्पर असतात. कधी रक्तगोठवणा-या थंडीत तर कधी घनदाट जंगलात ते वर्षभरासाठी राहतात. ते आपल्या कुटुंबाआधी देशाच्या संरक्षणाचा विचार करतात. मधुसदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी निर्मित ‘सजन घर आओ रे’ हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री लोकेश कुमारी शर्मा आणि अभिनेता रूफी खान यांनी या गाण्यात प्रमुख भुमिका साकारली आहे. प्रसिद्ध गायिका अन्वेशा हीने सुमधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. तर गाण्याचे बोल समिर सामंत यांनी लिहीले आहे. या गाण्याचे संगीत प्रसाद फाटक यांनी केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शक शहनवाझ बकल हे आहेत. शिवाय हे गाणं काश्मिर येथे चित्रीत करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माते श्रीनिवास कुलकर्णी या गाण्याविषयी सांगतात, “ब-याचदा कामानिमित्त काश्मीरला जाणं व्हायचं. तिथे आर्मीमध्ये असलेल्या काही जवानांची भेट झाली. त्यात काही तरूण आर्मी जवान होते त्यांचं नुकतचं लग्न झालं होतं. काहींना लग्नानंतर दोन तीन वर्ष घरी जाताचं आलं नाही. त्यांचे अनुभव ऐकून अक्षरश: अंगावर शहारे आले. ते कुटुंबापासून दूर राहून देशाची रक्षण करत असतात आणि त्यांच्या पत्नी कुटुंब सांभाळत असतात. दोघंही आपलं आयुष्य समर्पित करून आपली कर्तव्य बजावत असतात. याची जाणीव मला झाली. त्याच दरम्यान माझी संगीतकार प्रसाद फाटक यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला या गाण्याची कल्पना सुचवली. मला ही ते गाणं आवडलं. पुढे दिग्दर्शक शहनवाझ बकल यांनी ही कथा लिहीली आणि आम्ही हे गाणं काश्मिर वॅलीत चित्रीत करण्याचा निर्णय घेतला.”


पुढे ते सांगतात, “काश्मीरला निसर्ग सौंदर्य लाभले आहे. काश्मिरला आपल्या भारताची सीमा देखिल आहे. यातील दोन्हीही कलाकार काश्मीरचेच आहेत. तेथील माणसं फार चांगली आहेत. या गाण्याची खासीयत म्हणजे या गाण्याचा क्रू तिथलाचं आहे. गाण्यातला एक सिन अंधारात चित्रीत करताना तेव्हा तेथील तापमान -१० होतं. लोकेश कुमारीने -१० तापमानात नृत्य सादर केलं आहे. इतक्या रक्तगोठवणा-या थंडीत तिने त्याचं वेशभूषेत चेह-यावरील योग्य हावभाव ठेवून तो सीन चित्रीत केला. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आहेचं परंतु संपूर्ण टीमसुद्धा त्यांच्यासोबत तिथे होती. त्यामुळे गाण्याच्या टीमचे ही विशेष कौतुक.



जेव्हा हे गाणं आम्ही तिथल्या आर्मी कुटुंबाला दाखवलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आपसूकच अश्रू आले. ते म्हणाले धन्यवाद तुम्ही या विषयावर हे गाणं बनवलंत. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकताच मनाला एक वेगळचं समाधान मिळालं. आणि केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. देशरक्षणासाठी सदैव तत्पर असणा-या आर्मी जवानांच्या पत्नींना मी हे गाणं समर्पीत करतो.”