मुंबई : ट्रेलरच्या सुरूवातीला 'फिल्मवाली आपल्याला सांगणार राजनीती कशी केली जाते...हे पुरूषांचं जग आहे...' असं ऐकायला येत आहे. अशा परिस्थित जयललिता यांनी राजकारणाचा प्रवास सुरूच ठेवला. त्या नंतर त्यांनी कधीही मागे वळून नाही पाहीलं. रजकारणात आणि लोकांच्या मनात त्यांनी वेगळं वर्चस्व प्रस्थापित केलं. तेव्हा त्यांना अनेकांचा पाठिंबा लाभला पण अनेकांना त्यांचा विरोध देखील केला. पण  त्यांनी अभिनयासोबत राजकारणात देखील अनोखी कामगिरी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'थलायवी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात जयलालिता  यांची  व्यक्तिरेखा  अभिनेत्री  कंगना रानौत सारकताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये कंगनाने  बजावलेल्या भुमिकेमुळे तिचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. सध्या 'थलायवी' सिनेमाचा ट्रेलर तुफान व्हा.रल होत आहे. 


जयललिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या जीवनप्रवासाची अनेक पैलू उलगडले जाणार आहेत. जयललिता या एक राजकीय व्यक्तीमत्त्व म्हणून सर्वांमध्येच वावरत होत्या. पण, त्यांच्या जीवनातील असेही काही पैलू होते जे अनेकांना ठाऊकही नव्हते. असेच पैलू या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.