मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमधील सगळे एपिसोड नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या वेबसिरीजचे सगळे एपिसोड प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिजित पानसे यांनी दिग्दर्शन केलेली 'रानबाजार' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. पण चर्चा झाली ती म्हणजे प्राजक्ता माळीच्या पहिल्या टीझरची. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. हा टीझर जसा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता तेव्हा प्राजक्ता माळीच्या त्या बोल्ड सीनने धुमाकूळ घातला होता. काहींना हा टीझर खूप आवडला तर काहींना तो खटकला. पण तुम्हाला माहितीये का हा सीन कसा शूट करण्यात आला? 


तर आज आम्ही तुम्हाला या सीनच्या पडद्यामागची गोष्ट सांगणार आहोत. प्राजक्ता माळी त्या बोल्ड सीनबद्दल बोलताना म्हणाली, ''खरंतर तो सीन दिसायला बोल्ड असला तरी तो सीन शूट खूप गंमतीशीरपणे शूट झाला आहे. याचं कारण म्हणजे, मी खाटीवर झोपले होते आणि ती खाट हलवताना दाखवायची होती. तिथे एक मुलगी होती जी ती खाट हलवत होती पण ते तिच्याकडून होत नव्हतं. मग मी म्हणाले मी प्रयत्न करते. आणि मला ते जमलं आणि असा तो बोल्ड सीन शूट करण्यात आला. हे खूप गंमतीशीर होतं''. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'रानबाजार' ही वेबसीरिज प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वोबसिरीजनंतर प्राजक्ता आणि तेजस्विनी चर्चेत आहेत. याच बरोबर या सिरीजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचं कौतूक होत आहे.