अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीने सिनेमासाठी वाढवलं 15 ते 20 किलो वजन
ट्रेलरमध्ये प्लस साईज महिलेच्या विविध छटा दिसतात सोबतीलाच तिला आपण प्लस साइज असल्याची लाज वाटण्यापासून ते आत्मविश्वासापर्यंत तिला दररोज येणाऱ्या अडथळ्यांची गोष्ट यातून दिसतेय.
मुंबई : रिताभरी चक्रवर्तीचे चाहते फटाफाटीचा ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून त्यात अबीर चॅटर्जी यांच्या सोबत रिताभरी चक्रवर्ती मुख्य भूमिकेत दिसतेय. ट्रेलरमध्ये प्लस साईज महिलेच्या विविध छटा दिसतात सोबतीलाच तिला आपण प्लस साइज असल्याची लाज वाटण्यापासून ते आत्मविश्वासापर्यंत तिला दररोज येणाऱ्या अडथळ्यांची गोष्ट यातून दिसतेय.
ट्रेलर स्क्रीनवर प्ले करत असताना, त्याची सुरुवात रिताभरीपासून होते, एक महत्त्वाकांक्षी डिझायनर जिला फॅशनच्या जगात मोठं बनवायचं आहे. मात्र तिचे शारीरिक स्वरूप तिला पुढील पाऊल उचलू देत नाही आणि त्यानंतर सतत शरीराच्या आकारात आणि या विचारात ती राहते. तिच्या आत्मविश्वासाल डगमगून जाऊन तिचं आयुष्य विखरून जात. रिताभरीने या पात्रासाठी 25 किलो वजन वाढवलं होतं आणि अभिनेत्रीने पुन्हा एकदा फिट मॉडेल होऊन तिच्या अभिनयाने तिने सगळ्यांची मनं जिंकली !
विचार व्यक्त करताना रिताभरी म्हणाली की, ''मी खूप आनंदी आहे की ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ट्रेलर अविश्वसनीय आहेत आणि ज्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्या प्रत्येकासाठी मी आभारी आहे. हा चित्रपट खूप सुंदर झाला आहे त्यामागील कारण म्हणजे सुपर टीम ! प्रत्येकाला चित्रपटाचा अनुभव कधी घेता येणार यासाठी मी उत्सुक आहे ! ''
चित्रपटापूर्वीपासून आतापर्यंतचा तिचा प्रवास तिने सोशल मीडियाव्दारे शेअर केला होता. रिताभरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की, या चित्रपटासाठी तिला मोठ्या शारीरिक परिवर्तनातून जावं लागलं. वर्षभरात तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे तिला ६ महिने अंथरुणावर काढावे लागले. त्यादरम्यान अभिनेत्रीचं वजन 7 किलोने वाढलं होते. पण जेव्हा ती बरी झाली तेव्हा तिला काही चित्रपटांची ऑफर आली ज्यासाठी तिला पुन्हा फिट होणं आवश्यक होतं
रिताभरी पुढे म्हणाली की, त्याचवेळी तिला 'फटाफटी' चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आलं. हा चित्रपट करण्यासाठी अभिनेत्रीला तिचं वजन 15 ते 20 किलोने वाढवावं लागलं. हे एक मोठे चॅलेंज होतं. कारण हा चित्रपट करण्यासाठी मला बाकीचे चित्रपट नाकारावे लागले. जर मी शेपमध्ये आली नाही तर मला चित्रपटात काम करता येणार नाही, अशी भीतीही होती'' बॉडी शेमिंग सारख्या मुद्द्यांवर अभिनेत्री नेहमीच आपलं मत मांडते. शेवटी ऋताभरीने असंही सांगितलं की तिच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत.
फटाफाटीचे दिग्दर्शन अरित्रा मुखर्जी यांनी केलं आहे. ती प्रथमच अबीर चॅटर्जीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री स्वस्तिका दत्ता प्रमुख भूमिकेत आहे. कथा आणि पटकथा झिनिया सेन यांची आहे आणि संवाद साम्राग्नी बंदोपाध्याय यांनी दिले आहेत, विंडोज निर्मित. ब्रह्मा जानेन गोपन कोम्मोती नंतर Windows सह फटाफटी हा रिताभरीचा दुसरा चित्रपट आहे. हा चित्रपट 12 मे 2023 रोजी रिलीज होणार आहे.