मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून घरा-घरात पोहचलेला कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता त्याच्या लिखाणातून नेहमीच व्यक्त होत असतो. त्याच्या लिखाणावर त्याचे चाहतेही नेहमी प्रेमाचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. नुकतीच कुशलने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 खरंतर झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'  या शोमध्ये सेलिब्रिटी हजेरी लावतात आणि मग सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलदेखील अनेक खुलासे करतात. तसंच या शोमध्ये अनेक सिनेमांच्या टीम त्यांच्या सिनेमांच प्रमोशन करण्यासाठी देखील पोहचतात. नुकेतच या मंचावर आता प्रेक्षकांसाठी एक खास बातमी म्हणजे येणाऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ह्या कार्यक्रमात गौर गोपाळ दास ह्यांचे आगमन होणार आहे. गौर गोपाळ हे एक असं व्यक्तीमत्व आहे जे जीवनशैली कशी सकारात्मक असावी त्या बद्दल  ते प्रेरणात्मक विचार मांडत असतात. त्यांना या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहे.


कुशलने नुकताच सोशल मीडियावर 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गौर गोपाळ दास म्हणत आहेत की, ''कधी कधी मैत्रींमध्ये किंवा नात्यांमध्ये आपण लोकांच्या असे आहारी जातो की, आपलं अस्तित्व आहे की नाही माहिती नाही. आणि मग ते आपल्याला रिमोट कंट्रोल करतात. कधी चांगल म्हणतात आणि त्यांच्या वॅलिटेशनसाठी आपण थांबलेलो असतो. त्यांनी म्हटलं की तु खूप छान दिसतेस म्हटलं की, आपल्याला खूप आनंद होतो. आणि त्यांनी जर आपला अपमान केला तर आपल्याला ठेच पोहचते इथे नाही का? मग आपण काय करतो ना आपल्या भावनांचा रिमोट ना त्यांच्या हातात देतो. 


पण कोणाच्या आहारी जाणं म्हणजे काय? स्वत:ला विसरुन जाणं. स्वत:ची स्वतंत्र बुद्धी सोडून देणं. आणि आपल्या सुखाचा किंवा दु:खाचा रिमोट त्यांच्या हाती देणं. मला सुखी करायचं काम तुमचं आहे. मला दुखी करायचं काम तर तुम्ही करतच आहात.  रिमोट कंट्रोल ना एसी आणि टीव्ही साठी चांगला असतो. पण रिमोट कंट्रोल आयुष्यासाठी फार वाईट असतो. कारण लोकं ना आपल्या भावनांशी नेहमी खेळ खेळत असतात. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल त्याच्या हातात घेणं फार गरजेचं आहे.'' कुशलने शेअर केलला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मात्र कुशलने शेअर केलेल्या व्हिडिओला दिलेलं कॅप्शन सध्या त्याच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे, त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,''आपण माणसांवर प्रेम करतो, आपल्याला माणसांची सवय होते, पण समोरची व्यक्ती त्या लायक नसेल तर ? माझ्या आयुष्यातल्या 90% लोकांचा हा प्रॉब्लम आहे . आणि मी सुद्धा त्या 90% लोकांमध्ये येतो. Thank you.'