दीपवीरच्या चाहत्यांना स्मृती ईरानींचा सल्ला
हा फोटो बघून तुम्हाला देखील बसेल धक्का
मुंबई : असं वाटतं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने आपल्या लग्नाच्या फोटो पॉलिसीला अतिशय गंभीरपणे घेतलं आहे. दक्षिण भारतीय पद्धतीने म्हणजे कोकणी पद्धतीने या दोघांच 14 नोव्हेंबरला लग्न झालं. पण या न्यूली मॅरिड कपलचा एकही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला नाही.
सेलिब्रिटी लग्नाच्या इतिहासात हे पहिल्यांदा झालं आहे. सोशल मीडियाच्या येण्यानंतरही या कपलचे फोटो गुलदस्त्यात राहिले आहेत. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, दीपवीरची एक झलक पाहण्यासाठी फक्त चाहतेच नाही तर केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी देखील तेवढीच उत्सुक आहे.
चाहत्यांनी देखील ट्विटर आणि इंस्टाग्रामवर लग्नाबाबत # Deepveerkishadi, #DeepVeerwedding, #DipikaWedsRanveer असे अनेक टॅग तयार केले आहेत. हे हॅशटॅग अगदी चौदा तारखेच्या सकाळपासूनच सोशल मीडियावर ट्रेंड होत होते. दीपिका - रणवीरचे चाहते लग्नाच्या फोटोची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते. अशातच स्मृती ईरानी यांनी एका बॅंचवर बसलेला हाडांच्या सांगाड्याचा फोटो शेअर केला आहे. त्यावर लिहिलं आहे की, तुम्ही देखील दीपिका - रणवीरच्या लग्नाच्या फोटोची वाट पाहत असाल तर....
स्मृती ईरानींचा हा अंदाज अनेकांना आवडला. त्यातील अनेकांनी हाच फोटो शेअर करण्यास सुरूवात केली. यावरून हे नाकारता येत नाही की, दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंची फक्त चाहतेच नाही तर स्मृती ईरानी देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.