`विवाह`मधील अमृता रावच्या बहीणीचा संपूर्ण लूक , फोटो पाहून चाहते म्हणाले, विश्वासच बसत नाही
शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा विवाह हा चित्रपट सर्वांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे.
मुंबई : शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा विवाह हा चित्रपट सर्वांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. या चित्रपटात शाहिद आणि अमृताची भूमिका जितकी प्रेक्षकांना आवडली तितकीच अमृताची धाकटी बहीण चुटकी म्हणजेच अमृता प्रकाश हिची भूमिकाही प्रेकक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटात अमृता राव आणि तिच्या बहिणीच्या जोडीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. त्याचबरोबर या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण होणार आहेत. आता अमृताची बहिण चुटकी म्हणजेच अमृता प्रकाश हिचा लूक पूर्णपणे बदलला आहे, तिचा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
अमृताचा बदलला आहे पूर्ण लूक
अलीकडेच अमृता प्रकाशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अमृताची ही ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. काही फोटोंमध्ये ती बॅकलेस आउटफिट्समध्ये दिसत आहे. तिचा हा लूक पाहून एका चाहत्याने कमेंट केलीये की, विश्वास बसत नाही की तू पूर्णपणे बदलली आहेस. तर दुसरीकडे, दुसर्या यूजरने लिहिलं, ही तिच चुटकी आहे का?
सिनेमासोबतच सिरियलमध्ये केलंय काम
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अमृताने तिच्या करिअरला 2003 पासून सुरुवात केली होती. याआधी ती 'कोई मेरे दिल में है'मध्ये दिसली होती. त्यानंतर ती 'विवाह' चित्रपटात दिसली. या चित्रपटाने तिने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं होतं. यानंतर ती 'एक विवाह ऐसा भी' आणि 'तुम बिन मिली'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. अमृता प्रकाशने चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.