मुंबई : अमेरिकन अभिनेता मायकल के विल्यम्स, ज्याने "द वायर" या सुपरहिट सिरीजमध्ये ओमर लिटलची भूमिका साकारली होती. तो त्याच्या न्यूयॉर्क सिटी अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. अभिनेत्याने वयाच्या 54 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. न्यूयॉर्क पोलिसांनी त्याचा मृतदेह रात्री 2 च्या सुमारास त्याच्या घरातून बाहेर काढला. आतापर्यंत त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्बी पुरस्कार-नामांकित मायकेल के विल्यम्स एचबीओच्या बाल्टीमोर-आधारित वेब सीरिज द वायर मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध होता. न्यूयॉर्क पोलीस विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. न्यूयॉर्क पोलीस विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट जो गिमोएल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आणि सांगितलं की, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता ब्रुकलिनमधील विल्यम्स अपार्टमेंटमधून पोलिसांना आपत्कालीन कॉल आला. ज्याला पोलिसांनी प्रतिसाद दिला.



पण, जेव्हा पोलिस विलियम्सच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले तोपर्यंत तो मृतावस्थेत आढळला होता. एका अहवालानुसार, ब्रॉडवॉक एम्पायर अभिनेत्याचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनामुळे झाला आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी असंही स्पष्ट केलं की, पोलीस अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. दरम्यान, मृत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी जाहीर स्टेटमेंट जारी केलं आणि अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली.