`जिंदगी कितनी सस्ती हो गई है!...` निधनाच्या 6 दिवसांपूर्वी सिद्धार्थने केलेल्या कामाची काढली जातेय आठवण
निधनाच्या 6 दिवसांपूर्वी सिद्धार्थने केलेल्या कामाची काढली जातेय आठवण
मुंबई : 'जिंदगी कितनी सस्ती हो गई है!...' अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याने या छोट्या आयुष्यात केलेल्या चांगल्या कामांची दखल घेतली जात आहे. सिद्धार्थने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ह्रदय विकाराच्या धक्क्यामुळे सिद्धार्थ त्याच्या चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना सोडून गेला आहे. निधनाच्या 6 दिवसांपूर्वी सिद्धार्थने केलेल्या चांगल्या कामाची आठवण काढली जाते. सिद्धार्थ कायम त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधायचा.
एवढंच नाही तर तो त्याच्या चाहत्यांना योग्य मार्ग देखील दाखवायचा. सिद्धार्थचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना देखील फार आवडायचा. सिद्धार्थ कायम ट्विटरवर ऍक्टिव्ह असायचा. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तो म्हणत आहे की, 'जिंदगी कितनी सस्ती हो गई है!...'
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने 'बिग बॉस 13' सिझन आपल्या नावावर केलं. त्यानंतर 'खतरो के खिलाडी'मध्ये देखील त्याने विजय मिळवला. फक्त रियालिटी शो नाही तर सिद्धार्थने अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून तो घरा-घरात पोहोचला आणि प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. चाहत्यांच्या मनात राज्य करणाऱ्या सिद्धार्थने अखेर जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.
12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेला सिद्धार्थ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला. एका मॉडेलच्या रूपात त्याने करियरला सुरूवात केली. त्यानंतर 2004 साली त्याने अभिनयात पदार्पण केलं. 2008 रोजी त्याने 'बाबुल का आंगन छूटे' या मालिकेत दिसला. पण सिद्धार्थला लोकप्रियता 'बालिका वधू' मालिकेच्या माध्यमातून मिळाली.