मुंबई : अभिनेता आणि शिवसेना नेते किरण माने त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. नेहमीच ते त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशल लाईफमुळे चर्चेत असतात. नेहमीच ते आपल परखड मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी एखादं वक्तव्य केल्यावर लगेच चर्चेत येतं. नुकतीच किरण माने एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी  दिलेल्या मुलाखतीत  राजकरणात येण्यामागचं आणि शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं कारण सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच किरण मानेंनी कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला मुलाखती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले,  "व्यवस्था बदलायची असेल तर तुम्हाला राजकारणात यावं लागतं. यासाठी मी शिवसेनेत आलोय. या बदलाच्या प्रक्रियेत मला खारीचा वाटा असावा, असं मला वाटतं. मंत्रीपद मिळेल म्हणून तू गेला, असं मला अनेक जण म्हणाले. मी त्यांना सांगू इच्छितो की मला या लोकसभा निवडणुकीत एका महत्त्वाच्या मतदारसंघासाठी भारतातील खूप मोठ्या आणि जुन्या पक्षाने मला उमेदवारीची ऑफर दिली होती. हे जर मला शिवसेनेने सांगतिलं असतं तर मी कर्तव्य म्हणून निभावलं असतं. पण, तो पक्ष शिवसेना नव्हता.''


पुढे किरण माने म्हणाले, ''ही घटना फक्त त्या पक्षातील मला ऑफर देणारी मोठी व्यक्ती, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारेंना माहीत आहे. मी थेट मातोश्रीला फोन केला. उद्धवजींना मी हे सांगितलं. त्यांना हे आधीच कळलं होतं. त्यांना मी म्हटलं की शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर आणि शिवसेनेत आहे. शिवसेनेने सांगितलं तर मी ही जबाबदारी घेईन. अन्यथा मला हे नकोय. खरं तर तो पक्ष खूप मोठा होता. त्या मतदारसंघातून मी उभा राहिलो असतो तर ती राष्ट्रीय घडामोड झाली असती. मी तिथून निवडून आलो असतो तर खूप कॉन्ट्रोव्हर्सी आणि नाव झालं असतं. तरीही मी नाही म्हणून सांगितलं. कारण, मला शिवसेनेशी द्रोह करायचा नाही. मी विद्रोही आहे...द्रोही नाही. मला कुठल्याही पदाचा, धनाचा मोह नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी ठाकरेंबरोबर राहणार,"