नवी दिल्ली : २८ ऑगस्टपासून सुरू झालेला 'केबीसी ९' या कार्यक्रमाने पदार्पणापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले. अल्पावधीतच या कार्यक्रमला मिळणारा प्रतिसादही थक्क करणारा आहे. पण, या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी काहीशी धक्कादायक बातमी आहे. हा कार्यक्रम लवकरच बंद होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉ़लिवूडचा शेहेनशाह बीग बी अमिताभ बच्चन हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच रंजक होतो. सोनी टीव्हीवरून प्रसारीत होणारा हा कार्यक्रम लवकरच बंद होणार असून, त्याजागी नवा कार्यक्रम रिप्लेस केला जाणार आहे. 'केपीसी-९' चा शेवटचा भाग २३ ऑक्टोबरला प्रसारित केला जाईल.


२३ ऑक्टोबर नंतर रात्री ९ ते १०.३० हा कालवधी तीन नव्या कार्यक्रमासाठी दिला जाणार आहे. स्पॉटबॉय डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले असून, या वृत्तात वादग्रस्त कार्यक्रम 'पहरेदार पिया की' या कार्यक्रमाचा सीक्वल, याजद खानचा हासिल आणि एक दीवाना था हे कार्यक्रम केबीसीची जागा घेतील.


पहारेदार पिया की या कार्यक्रमाचा सीक्वल रिश्ते लिखेंगे हम नये ला प्राईम टाईम ९ ची वेळ दिली जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेजस्वी प्रकाश, रोहित संचेती पुनरागमन करत आहेत. या कार्यक्रमाचे शुटींग बिकानेरमध्ये सुरू झाले आहे. ९.३० ची वेळ जायद खानचा कार्यक्रम हासिलसठी तर, १० ची वेळ एक दीवाना था साठी दिली जाणार आहे.