मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अधिक चर्चेचा विषय असतो, तो म्हणजे सेलिब्रिटींचे रिलेशनशिप. याठिकाणी कधी कोणाचं ब्रेकअप होतं तर काहीच्या नव्या नात्याला सुरूवात होत. आता बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळख असलेले सेलिब्रिटी सध्या त्यांच्या एक्समुळे चर्चेत आहे. या सेलिब्रिटींना बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याचा 'दी एन्ड' केला. अशाचं काही कलाकारांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अभिनेत्री आलिया भट्ट




सध्या आलिया अभिनेता रणबीर कपूरला डेट करत आहे. पण रणबीरच्या आधी तिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव आहे,  अली दरारकर... जेव्हा आलिया अभिनेत्री नव्हती तेव्हा ती आणि अली एकमेकांना डेट करत होते. पण बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यानंतर तिने अलियाने अलीला बाय-बाय केलं. 


अभिनेता अर्जुन कपूर




अभिनेता होण्याआधी अर्जुन अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता शर्माला डेट करत होता. पण त्यांचं नात फार काळ टिकू शकलं नाही. आता अर्जुन अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. 


अभिनत्री प्रियंका चोप्रा




प्रियंका नुकताचं एका बाळाची आई झाली आहे. तिने काही वर्षांपूर्वी गायक निक जोनससोबत लग्न केलं. पण याआधी जेव्हा ती मॉडलिंग क्षेत्रात होती, तेव्हा ती असीम मर्चंटला डेट करत होती. आता प्रियंका तिच्या आयुष्यात फार पुढे गेली आहे. 


अभिनेत्री दीपिका पादुकोण 




दीपिका पदुकोण ऍक्टिंग स्कूलमध्ये भेटलेल्या निहार पांड्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हिमेश रेशमियाच्या 'आप का सुरूर' या अल्बममधील दोन वेगवेगळ्या गाण्यांमध्ये होते. जेव्हा ती लोकप्रिय होऊ लागली तेव्हा त्यांचे नाते संपुष्टात आले.