फक्त लव्हस्टोरीमुळे नाही तर `केदारनाथ` या 5 कारणांमुळे खास
पाहा हा सिनेमा
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि मोठ्या पडद्यावर डेब्यू करणारी सारा अली खान यांचा 'केदारनाथ' या सिनेमाचा आज ट्रेलर रिलीज झाला. सुशांत आणि साराच्या चाहत्यांना हा ट्रेलर अतिशय आवडला. आतापर्यंत 'केदारनाथ' सिनेमाच्या ट्रेलरला साडे तीन लाखांहून अधिक पाहिलं आहे. सुशांतचे चाहते या सिनेमाबाबत खूप उत्सुक आहेत. पण हा सिनेमा लोकप्रिय होण्यामागे आणखी 5 खास कारण आहेत
सैफ अली खानच्या मुलीचा पहिला सिनेमा
'केदारनाथ' या सिनेमाची चर्चा जोरदार रंगली कारण यामध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाप्रमाणेच चाहत्यांना साराकडून देखील खास आशा आहे. यामुळे हा सिनेमा अतिशय खास आहे.
उत्कृष्ठ कथा
या सिनेमाची उत्कृष्ठ कथा तर आहेच पण त्यासोबत रोमँटिक ड्रामा देखील यामध्ये पाहायला मिळणार आहे. सुशांत सिंह राजपूत या सिनेमात एका मुस्लिम मुलाची भूमिका साकारत आहे तर सारा अली खान ब्राम्हण मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे. यामुळेच केदारनाथ हा सिनेमा खूप खास आहे.
2013 मधील प्रलय
या सिनेमात लव्हस्टोरीबरोबरच 2013 मध्ये आलेल्या केदारनाथ प्रलयाबाबतही यामध्ये दाखवण्यात आलं आहे. या प्रलयात हजारो लोकांचा मृत्यू झाला. ट्रेलर बघून अशी चर्चा आहे की, सिनेमात हा प्रलय खूप उत्तम प्रकारे दाखवलं आहे.
वीएफएक्सचा प्रयोग
केदारनाथ या सिनेमात वीएफएक्सचा उत्तम प्रयोग करण्यात आला. ट्रेलर पाहताच कळते की, वीएफएक्सकरता भरपूर पैसा खर्च करण्यात आला आहे. यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडेल.
सुशांत सिंह राजपूत
केदारनाथ या सिनेमाला सुशांत सिंह राजपूत हा अभिनेता खास बनवतो. या सिनेमात सुशांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांना खूप अपेक्षा आहे. एम एस धोनी सिनेमानंतर आपण ते अनुभवलंच आहे.