Top Bold Web Series of the Year : OTT आणि डिजिटल कटेंटचं जग आज सिनेमांच्याही पुढं गेलं आहे. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेस आज सिनेमांपेक्षा वेब शोज आणत आहेत. कोविड-19 साथीच्या वेळी अनेक बॉलिवूड चित्रपट OTT वर प्रदर्शित झाले. 2022 मध्ये या काही पाच वेब सिरिज आहेत ज्यांनी एकाच वेळी त्यांच्या व्हुवर्सनी आणि कटेंटनं इंटरनेटवर राज्य केलं आहे. तूम्ही 2022 च्या टॉप 5 बोल्ड वेब सिरीज स्क्रोल केल्या का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Netflix वर ये काली काली आंखे
ये काली काली आंखें मालिकेत ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी शर्मा आणि आंचल सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेबसिरिज 14 जानेवारी रोजी रिलीज झाली आणि सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे आणि त्यात अनेक बोल्ड दृश्यं आहे.


Amazon Prime Video वर मिर्झापूर सीझन 3
सर्वात प्रसिद्ध आणि पसंतीस उतरलेल्या वेब शोपैकी एक - मिर्झापूर सीझन 3 परत ओटीटीवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज आहे. त्याचे मागील दोन सीझन त्याच्या बोल्ड आणि कॉट्रोेव्हर्शल कटेंटसाठी चर्चेत राहिले, म्हणून मिर्झापूर सीझन 3 मध्ये आता लोकं वाट पाहत आहे कलेन भैयाची पुढची मोठी चाल आता काय असेल? 


Disney+ Hotstar वर मानवी वेब सिरीज
भारतातील मानवी औषधांच्या चाचण्यांच्या अंधाऱ्या जगावर आधारित 'ह्यूमन' ही सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज औषधांच्या जगाची अनपेक्षित गुपिते उलगडून दाखवते आणि खून, गूढता, वासना आणि हेराफेरी अशा चित्तथरारक कथा असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विपुल अमृतलाल शाह आणि मोझेझ सिंग दिग्दर्शित डिस्ने+ हॉटस्टार स्पेशल वेब शो मोजेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी लिहिला आहे. या शोमध्ये लेस्बियन किसिंग सीनही आहे. 


Mx player वर एक थी बेगम
एमएक्स प्लेयर एक थी बेगम ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अश्रफ उर्फ ​​सपना तिच्या पतीच्या हत्येनंतर बदला घेण्याचे वचन घेते आणि आपला बदलाही पुर्ण करते. यात अनुजा साठे, राजेंद्र शिसाटकर, अंकित मोहन, विवेक आपटे, राजू आठवले, वैभव आंबेकर, अमितराज यांच्या भूमिका आहेत. या मालिकेत अनेक सेक्स आणि किसिंग सीन्स आहेत. 


Voot वर आधा इश्क
आधा इश्कची कथा काश्मीर आणि मसुरीच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. आधुनिक काळातील प्रणय आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांचा शोध घेणारा हा 9 भागांचा ड्रिल असेल. यात आमना शरीफ, प्रतिभा रंता आणि गौरव अरोरा आहेत.