मुंबई : चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा मार्ग निवडला आहे. या यादीत प्रियांकापासून शिल्पापर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्टार कमल हासन आणि सारिका यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन हिने प्लास्टिक सर्जरी केल्याचं मान्य केलं होतं. श्रुतीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.


प्रियांका चोप्रामध्ये देखील सर्जरीनंतर मोठा फरक स्पष्ट पडला असल्याचं बोललं जात आहे. प्रियांकाने स्वतः हे मान्य केले आहे, तिने ओठ आणि नाकाची सर्जरी केली आहे.


बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, खुद्द अभिनेत्रीने ही गोष्ट मान्य केली आहे.



'साकी साकी' या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या कोएना मित्राचा शस्त्रक्रियेचा अनुभव खूपच भयानक आहे. सर्जरीनंतर कोयनाचा चेहरा खराब झाला, त्यानंतर अभिनेत्रीला इंडस्ट्रीत काम मिळणेही बंद झाले.


राखी सावंतने उघडपणे कबूल केले आहे की तिने तिच्या चेहऱ्याची आणि स्तनाची शस्त्रक्रिया केली आहे.