मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या '83' चित्रपटामुळे  चर्चेत आहेत. चित्रपटात रणवीरने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिकाने दीपिकाने त्यांची पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस एकत्र आले आहेत. रिअल लाईफपासून ते रील लाईफपर्यंत दोघे एकत्र दिसले, पण असं असूनही रणवीर आजपर्यंत दीपिकाचा आवडता बनू शकला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा पुरावा स्वतः दीपिकाने दिला आहे. दीपिका पदुकोणने 2021 च्या अखेरीस एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये दीपिकाने काही फोटो शेअर केले आहेत आणि सांगितले आहे की, या वर्षी तिने तिला आवडत असलेल्या सर्व गोष्टी केल्या. दीपिकाच्या आवडतीच्या गोष्टींच्या यादीत रणवीर मात्र नाही. 



या यादीमध्ये ती स्वत: आहे, दुसरी गोष्ट म्हणजे खाद्यपदार्थ, तिसरी गोष्ट गुलाबांचा पुष्पगुच्छ आणि चौथी गोष्टी तिची फ्लाइट आहे. मात्र यादरम्यान दीपिका रणवीर सिंगचे नाव घेण्यास मात्र विसरली.


फोटो शेअर करत दीपिका म्हणाली, 'वर्षाच्या शेवटी अन्न, फुले आणि प्रवासाविषयी मला आवडणारी सर्व चित्रे.' सध्या दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.