मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्याच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर ३डी' (Street Dancer 3D) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वरुणला गुजरातमध्ये 'काईट फेस्टिव्हल'मध्ये पतंग उडवताना पाहण्यात आलं. पतंग उडवतानाचा एक व्हिडिओ वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वरुणसोबत श्रद्धा कपूरही दिसत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी वरुणने भारतीय जवानांसोबतचे काही फोटो शेअर केले होते. आपल्या जवानांसोबत घालवलेले दोन दिवस अतिशय चमत्कारिक असल्याची भावना त्याने व्यक्त केली होती. याद्वारे भारतासाठी लढणाऱ्या आपल्या सर्व जवानांचे त्याने आभारही मानले आहेत. 



'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाचं रेमो डिसूजा दिग्दर्शन करत आहे. तर टी-सीरीजने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात वरुण, श्रद्धाशिवाय प्रभुदेवा, शक्ति मोहन आणि नोरा फतेहीदेखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 'स्ट्रीट डान्सर ३डी' येत्या २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.