राम सेतू सिनेमा पाहण्याचा विचार करताय? का पाहावा हा सिनेमा वाचा Ram Setu Review
![राम सेतू सिनेमा पाहण्याचा विचार करताय? का पाहावा हा सिनेमा वाचा Ram Setu Review राम सेतू सिनेमा पाहण्याचा विचार करताय? का पाहावा हा सिनेमा वाचा Ram Setu Review](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2022/10/25/531608-ram-setu-movie-review.png?itok=eMZ3FQrk)
Ram Setu Movie : राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा यांच्या मुख्य भूमिका असून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा राम सेतू हा चित्रपट आज (२५ ऑक्टोबर) प्रदर्शित झालय. हा चित्रपट एक अॅक्शन-पॅक अॅडव्हेंचर थ्रिलर चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार पुरातत्व अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrat Bharucha) त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर जॅकलीन (jacqueline fernandez) पर्यावरण शास्त्रज्ञ आहे. अक्षय कुमारच्या 'राम सेतू' या चित्रपटाची कथा (Ram Setu story) सत्य घटनांवर आधारित असली तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ती सर्जनशील स्वातंत्र्यासह मांडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना 'पैसा वासूल' चित्रपट पाहायला मिळणार आहे.
सर्व कलाकारांनी यामध्ये उत्तम अभिनय केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. चित्रपटातील पार्श्वसंगीत देखील चांगले आहे. या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स आणि सीजीआयवर उत्तम काम करण्यात आले आहे. CGI मधून समुद्राच्या आतील बाजूने दिसणारे दृश्य खूपच प्रेक्षणीय आहे. या चित्रपटाची अनेक लोकेशन्सही सुंदर आहेत.
चित्रपटात अक्षय एक नास्तिक पुरातत्व अधिकारी आहे, जरी तो सत्य लोकांसमोर मांडतो. सरकार सर्वोच्च न्यायालयाने भगवान रामाला काल्पनिक पात्र ठरवताना, त्यांच्या वानर सेनेने बांधलेला राम सेतू ही केवळ नैसर्गिक घटना आहे आणि हा राम सेतू रामेश्वरम ते श्रीलंकेपर्यंत तोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर या कथेत अक्षयची एंट्री होते. राम सेतूचे सत्य जाणून घेऊन विरोधी पक्षाचा नेता अक्षय कुमारला 'राम सेतू खरा की फक्त काल्पनिक' हे शोधून काढण्याचे मिशन देतो.
अक्षय कुमारचा चित्रपट 'राम सेतू' कुटुंबासोबत पाहण्याचा आनंद लुटता येईल. चित्रपटात ड्रामा, इमोशन्स, कॉमेडी आणि भरपूर अॅक्शन आहे. धर्म आणि विज्ञानाच्या या मिश्रणामुळे लोकांची उत्सुकताही वाढेल आणि सर्वांचे भरपूर मनोरंजनही होईल. त्यामुळे तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायचा असेल, तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्कीच हा चित्रपट पाहू शकता.