मुंबई : बॉलिवूडचा सदाबहार अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्याविषयी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. नुकतीच मिथुन यांनी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या सोबत असलेल्या मैत्रीबद्दल सांगितले. एवढंच काय तर पद्मिनी यांना पळून जाऊन निर्माता प्रदीप शर्मा यांच्याळी लग्न करता यायला हेव म्हणून मिथून यांनी पोटदुखीचं नाटकही केलं होतं. 
 
मिथुन पुढे म्हणाले, 'कोणाला माहीत नाही, पण आमच्या शूटिंगच्या दिवशी मी पद्मिनीचं लग्न केले होतं. खरं तर सगळ्यांसमोर पोटदुखीचं नाटक केलं म्हणून ती पळून गेली. ती लग्न करून परत येऊ शकेल म्हणून मी असं केल. मी त्यांना पळून जाण्यास मदत केली. त्या दिवशी ती परत येईपर्यंत मी पोटात दुखत असल्याचे नाटक करत राहिलो. ही गोष्ट आजपर्यंत कुणालाच कळलेली नाही. (This Actor Helped Padmini Kolhapure To Get Married) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : धक्कादायक! निर्मात्यांकडून चित्रपटासाठी खरा बलात्कार आणि हत्या..., जगभरात Ban आहे 'हा' चित्रपट


मिथुन आणि पद्मिनी दोघेही 33 वर्षांनंतर सिंगिंग रिअॅलिटी शोच्या सेटवर एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या भूतकाळातील अनेक गोष्टीं प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. पद्मिनी यांनी त्या दोघांचे टॉम आणि जेरीचे नाते कसे होते आणि ते अनेकदा कसे भांडायचे ते सांगायचे.  


पाहा काय म्हणाले मिथुन चक्रवर्ती -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पद्मिनी म्हणाल्या, 'हे खरं आहे, पण मला हे सांगायचं आहे की मिथुन दा आणि मी नेहमी टॉम आणि जेरी सारखे सेटवर खूप भांडायचो. त्यांना मी केलेल्या प्रत्येक गोष्टीत अडचण येत होती आणि ते मला सतत चिडवायचे. पण, जेव्हाही आम्ही एकत्र नाचलो तेव्हा ते तुमच्यासारखेच होते, जसे काही आम्ही दोघेही मनापासून एकमेकांवर प्रेम करतो आणि ते संपताच आम्ही स्विच ऑफ व्हायचो आणि पुन्हा भांडायचो.'


मिथुन यांनी उत्तर दिले की, 'ती जे काही बोलते ते पूर्णपणे वेगळं आहे. तिला डोळा चोळण्याची सवय होती, ज्याला आम्ही बंगाली अपशगुन मानतो. पण फक्त मला चिडवण्यासाठी ती माझ्यासमोर असं करायची. सेटवर तिला नेहमी तिच्या मनासारखं काम करायचं होतं आणि म्हणूनच आम्ही भांडायचो.'