Know Child Artist : असे खूप कमी कलाकार असतात जे 60 वर्षांचे झाल्यानंतर जास्त काम करत नाहीत. तर काही कलाकार असतात जे त्या वयातही अनेक सुपरहिट चित्रपट देतात. काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. मात्र, आज 60 ठीत किंवा त्याहून जास्त वय असलेले कलाकार देखील चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. दरम्यान, अशाच एका कलाकाराचा बालपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्याकाळातील हा लोकप्रिय बालकलाकार होता. हा एकमेव अभिनेता आहे जो फक्त बालपणी नाही तर तरुणपणात देखील लोकप्रिय होता. या अभिनेत्यानं छोट्या पडद्यापासून, चित्रपट आणि आता OTT वर देखील तो त्याची जादू करत आहे असं म्हणायला हरकत नाही. या अभिनेत्यानं फक्त हिंदी नाही तर मराठी आणि अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तुम्हाला जर हा बालकलाकार ओळखता येत नसेल तर हा मुलगा शोले या चित्रपटात देखील दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता हा बालकलाकार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला जाणून घेऊया. या बालकलाकारानं 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या वाया गेलेल्या भावाची भूमिका साकारली होती. याशिवाय याच बालकलाकाराला तुम्ही 'शोले'मध्ये देखील पाहिले आहे. त्यात गब्बरने क्रूरपणे त्याला मारलेल्या अहमदची भूमिका साकारली होती. तर 'नदी के पार' चित्रपटात चंदनची भूमिका साकारली होती. अजूनही तुम्ही या अभिनेत्याला ओळखू शकला नाहीत. तर या अभिनेत्याचं नाव आहे सचिन पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी वयाच्या अवघ्या चार वर्षांचा असताना अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सचिन यांनी बालकलाकार म्हणून पन्नासपेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. त्या सोबतच त्यांनी बालकलाकार म्हणून जेव्हा काम केलं तेव्हा त्यांनी धर्मेंद्र आणि संजीव कपूर यांच्यासारख्या कलाकारांसोबत देखील काम केलं आहे. 


हेही वाचा : Animal मधील न्यूड सीनवरून ट्रोल होणाऱ्या तृप्ती डिमरीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी खूप...'



सचिन यांनी जेव्हा महत्त्वाची भूमिका साकरण्याचा विचार केला तेव्हा त्यांना पहिला मिळालेला चित्रपट हा बालिका वधु होता. बड़े अच्छे लगते हैं... हे गाणं त्याच चित्रपटातील होतं आणि याच चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यानंतर त्यांनी अंखियों के झरोखे से, नदिया के पार, सत्ते पर सत्ता, त्रिशूल सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी फक्त बॉलिवूड नाही तर छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे. याशिवाय त्यांनी कॉमेडी तू तू मैं मैं या मालिकेचे दिग्दर्शन केले. तर त्यांची ही मालिका चांगलीच हीट झाली होती. सचिन बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार असे काम केले आहे. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर या लोकप्रिय अभिनेत्री आहेत आणि लेक श्रीया पिळगावकर देखील अभिनेत्री आहे.