Rani Mukerji : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीनं 1997 मध्ये अभिनय क्षेत्रात आपल्या करियरची सुरुवात केली. राणीचा पहिला चित्रपट हा ‘राजा की आएगी बारात’ हा होता. राणीनं तिचा आवाज, अभिनय आणि नेहमीच हसत राहणारी अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या मनात जागा केली. इतक्या सगळ्या गोष्टी असल्या तरी राणी चर्चेत असण्याचं कारण तिची हाईट होती. तुम्हाला माहित आहे का की तिच्यासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता तिला ‘डेढ फुटिया’ म्हणायचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणी मुखर्जीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 1992 मध्ये बंगाली चित्रपटसृष्टीत 'बियेर फूल'  पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटात तिनं छोटी भूमिका साकारली होती. दरम्यान, राणीचा एक सह-कलाकार तिला ‘डेढ फुटिया’ म्हणायचा. महत्त्वाचं म्हणजे तिला त्याचं वाईटही वाटत नव्हतं. राणीला ‘डेढ फुटिया’ बोलणारा तो अभिनेता कोणी दुसरा नाही तर बॉबी देओल आहे. बॉबी आणि राणी हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. तर बॉबी तिला सतत तिची खिल्ली उडवायचा. दोघांनी एकत्र बिच्छू’ आणि ‘बादल’ या चित्रपटांमध्ये काम केलं. त्या दोघांचे हे दोन्ही चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाले आणि हे त्यावेळी सुपरहिट देखील ठरले होते. त्यांची गाणी देखील तितकीच लोकप्रिय ठरली होती. 


‘कॉफी विद करण’ च्या 8 व्या सीझनमध्ये बॉबी देओलनं याची आठवण करुन दिली. राणीसोबत असलेल्या बॉडिंगवर बॉबी देओलनं सांगितलं की 'दोघं खूप चांगले मित्र आहेत. राणी खूप चांगल्या स्वभावाची मुलगी असल्याचं त्यानं सांगितलं आणि म्हणाला की तो ‘डेढ फुटिया’ बोलवतो.' ते ऐकल्यानंतर करण जोहरला धक्का बसला आणि तो म्हणाला की 'उंचीवरून खिल्ली उडवतो.' त्यावर बॉबी म्हणाला, 'असं नाही, तिला वाईट वाटत नाही आणि आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळे अशी मस्करी चालते आणि तिनं देखील मला टोपण नाव दिलं होतं. ती मला बोबड्या बोलायची.'


हेही वाचा : दाक्षिणात्य अभिनेता 410 कोटींचा मालक मात्र त्याचा मुलगा स्पेनमध्ये करतोय शेती! आई म्हणाली, 'त्याचा काही...'


दरम्यान, राणीनं वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत सगळ्यांची मने जिंकली आहेत. तर राणी सगळ्यात शेवटी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटात दिसली होती.