'दिल चाहता है' या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानसोबत दिसलेली अभिनेत्री सुचित्रा पिल्लईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सुचित्रा आता जयदीप अहलावत आणि सोनाली बेंद्रेच्या 'ब्रोकन न्यूज 2' मध्ये दिसणार आहे. तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता सुचित्रानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. तिनं सांगितलं की मीडियामध्ये प्रीति झिंटाच्या बॉयफ्रेंडला हिसकावण्याचा ठप्पा लावला जे पूर्णपणे चुकीचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा पिल्लईनं खुलासा केला की तिचा नवरा लार्स केजेल्डसननं आधी प्रीतिला डेट केलं होतं पण त्यांनी ती त्यांच्या ब्रेकअपचं कारण नव्हती याचा खुलासा तिनं केला आहे.  'बॉयफ्रेंड स्नॅचर' च्या या टॅगवर सुचित्रा म्हणाली, "प्रीति आणि मी कधीच मैत्रिणी नव्हतो. आम्हाला एक गोष्ट माहित होती की आमचा एक कॉमन फ्रेंड आहे. पण हा, लार्सनं प्रीतिला डेट केलं होतं. माझ्या भेटण्याआधी त्यांचा ब्रेकअप झाला होता. फक्त हिच गोष्ट खरी आहे की मी त्या दोघांमध्ये आले नाही. ते दोघं वेगळ्या कारणामुळे विभक्त झाले होते." 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सुचित्रा पिल्लईनं या घटनेचा संपूर्ण प्रसंग आठवत सांगितलं की जेव्हा ती इंग्लंडवरून परतली होती आणि एंड्रयू कॉइनला डेट करत होती. एंड्रयूचा त्या वेळी मॉडेल अचला सचदेवसोबत ब्रेकअप झाला होता आणि त्यासाठी देखील सुचित्राला दोषी ठरवण्यात आलं होतं. ते ब्रेकअप देखील तिच्यामुळे झालं नव्हतं. अचला आणि सुचित्रा दोघेही या बातमीवर हसतात. 


सुचित्रा पिल्लईनं प्रीति झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंड लार्सशी 2005 मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून अन्निका असं तिचं नाव आहे. 2016 मध्ये प्रीतिनं जीन गुडइनफशी लग्न केलं आणि 2021 च्या मदतीनं त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. त्या दोघांचाही चेहरा त्यांनी आजवर कोणाला दाखवलेला नाही. 


हेही वाचा : VIDEO : माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...


दरम्यान, सुचित्रा पिल्लई विषयी बोलायचं झालं तर 90 च्या दशकात एका म्युजिक व्हिडीओमुळे लोकं तिला ओळखू लागले आहेत. त्या म्युजिक व्हिडीओचं ना व 'हिप हिप हुर्रे' असं होतं. तर त्यात सुचित्राची अलकनंदा मॅम ही भूमिका होती.