प्रसिद्ध अभिनेत्रीचं 10 वर्षांनी लहान व्यक्तीशी लग्न
इश्कबाज आणि नागिन सारख्या मालिकांमध्ये काम करून मृणाल देशराजने खूप लोकप्रियता मिळवली.
मुंबई : इश्कबाज आणि नागिन सारख्या मालिकांमध्ये काम करून मृणाल देशराजने खूप लोकप्रियता मिळवली. अलीकडेच, मृणालने वयाच्या ४३ व्या वर्षी हेल्थ आणि वेलनेस इंडस्ट्रीशी संबंधित असीम माथनसोबत लग्न केलं. हे कपल एक वर्ष एकमेकांना डेट करत होतं. आणि या जोडप्याने 9 जून रोजी साखरपुडा केला आणि त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जुलैमध्ये लग्न केलं.
मृणालचा नवरा तिच्यापेक्षा १० लहान आहे. मात्र, वयाबद्दल बोलताना ती म्हणाली की, हा फक्त एक आकडा असून या सगळ्या गोष्टींचा आयुष्यावर परिणाम होत नाही. पण प्रेमात मृणालची ५ वेळा फसवणूक झाल्याचं तुम्हाला माहीत आहे का?
मृणालला असं वाटतं की, तिला अशिमच्या रूपात खरं प्रेम मिळालं आहे. जे तिच्यासाठी देखील योग्य आहे. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मृणालच्या आयुष्याशी संबंधित कधी न ऐकलेले किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आतापर्यंतच्या कारकिर्दीत मृणालने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीने स्टार प्लस शो इश्कबाजमध्ये जान्हवी ओबेरॉयची भूमिका साकारली होती. मृणाल शेवटची नागिन ३ मध्ये दिसली होती. मृणाल तिचं आयुष्य खूप मस्त जगते, पण प्रेमात तिची ५ वेळा फसवणूक झाली आहे.
मृणालने हार मानली नाही
पाच वेळा फसवणूक होऊन मृणाल तुटली असली तरी तिने हिंमत कधीच गमावली नाही. अशिम माथनच्या रूपाने अभिनेत्रीला खरं प्रेम मिळालं. आशिम माथन आणि मृणाल देशराज यांची 2021 मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे भेट झाली. त्यानंतर हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि त्यांच्या नात्याचं रुपांतर प्रेमात झालं.
त्यांच्या एंगेजमेंटबद्दल बोलताना मृणाल म्हणाली की, आशिमने तिला गोव्यात प्रपोज केलं होतं. त्यानंतर आमची मुंबईत एंगेजमेंट झाली. त्यानंतर मृणाल आणि आशिमने ८ जुलै रोजी कोर्ट मॅरेज केलं.