मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आई झाल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. नुकतीच आलिया भट्टने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आता बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने सोशल मीडियाव्दारे गुडन्यूज शेअर केली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ये 'जवानी है दिवानी' (Yeh Jawaani Hai Deewani)मध्ये या अभिनेत्रीने रणबीर कपूरसोबत बरीच फ्लर्ट करताना दिसली होती. या सिनेमात या अभिनेत्रीचा रोल खूप छोटा होता. मात्र आजही लोकांच्या मनात या पात्राने घर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्रीने 'यारियां'  (Yaariyan) सारख्या अनेक सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे आणि ही अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणआर आहे. २०२२ मध्ये या अभिनेत्रीची मुलगी एक वर्षाची झाली. आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून  एवलिन शर्मा आहे.  एवलिन लवकरच आई होणार आहे.  


बेबी बंप दाखवत शेअर केली गुडन्यूज
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत एक गुडन्यूज शेअर केली आहे. या फोटोत एवलिनने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि जॉगर्स घातली आहे. एवलिनने घट्ट पण आरामदायी कपड्यांमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली आहे. बेबी बंप फ्लाँन्ट करताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर गर्भधारणेचा ग्लो स्पष्टपणे दिसतोय. या पोस्टसोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी आता तुला माझ्या मांडीवर घेवून तुला खाऊ घालायला खूप उत्सुक आहे!! दुसरं बाळ येत आहे!'



Yeh Jawaani Hai Deewani मधील ही एक्ट्रेस आहे प्रेग्नंट
इथे आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, याचा अंदाज तुम्हाला आता आला नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, 'ये जवानी है दिवानी'मध्ये 'लारा'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री 'एवलिन शर्मा' आहे. एवलिन एका मुलीची आई आहे आणि आता तिने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करून दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.