नेहाच्या लग्नाच्या बातमीनंतर या भोजपुरी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
हे गाणे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेब म्युझिक द्वारे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री नेहा धुपियानं दिलेल्या आपल्या 'सिक्रेट' लग्नाच्या बातमीनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. गंमत म्हणजे, नेहानं दिलेल्या या बातमीनंतर थोड्याच वेळात एक भोजपुरी गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं... आता तुम्ही म्हणाल की या भोजपुरी गाण्याचा आणि नेहा धुपियाच्या लग्नाचा काय संबंध? तर हे भोजपुरी गाणं नेहा धुपियाच्या नावानंच बनवण्यात आलंय. या गाण्याचे बोल आहेत 'हम बोल तानी तोर नेहा धूपिया'...
हे गाणे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेब म्युझिक द्वारे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आत्तापर्यंत हे गाणं जवळपास 6,061,534 वेळा पाहण्यात आलंय.
आयुष्याचा सर्वोत्तम निर्णय... मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत विवाह केलाय... अशी कॅप्शनही नेहानं ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोला दिलीय. तर अंगद बेदीनंही नेहासोबत फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हटलं... 'बेस्ट फ्रेंड आता पत्नी बनलीय... हॅलो मिसेस बेदी' .
2002 साली 'मिस इंडिया' ठरलेल्या नेहानं तिचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत विवाह केलाय . 37 वर्षीय नेहा आणि 35 वर्षीय अंगदचा विवाह गुरुद्वारामध्ये संपन्न झालाय. त्यानंतर नेहा आणि अंगदनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या विवाहाचा फोटो शेअर केलाय. अंगद बेदी माजी क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांचा मुलगा आहे आणि रणजीही खेळलाय. नुकताच अंगद 'टायगर जिंदा है' आणि 'पिंक' या सिनेमांतही दिसलाय.