मुंबई : सध्या 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट खूप चर्चेत आहे. मात्र याचदरम्यान एका अभिनेत्रीने या चित्रपटावर निशाणा साधला. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी तिचा क्लास घेतला. तिचं एक ट्विट तिला इतकं भारी पडलं की, चित्रपट समर्थकांनी सोशल मीडियावर जोरदार तिच्यावर टीका करायला सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटरवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं की, 'जर तुम्हाला कोणी तुमच्या प्रयत्नांच्या यशाबद्दल अभिनंदन करावं असे वाटत असेल.. तर कदाचित गेली पाच वर्षे डोक्यावर बसून  वाया घालवू नका.'. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडली आहे. त्याचबरोबर, नुकतीच ती पुन्हा एकदा अशाच एका कारणांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.






स्वरा भास्करने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये कोणाचंही नाव नं घेता एक ट्विट केलं आहे. जे 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यावर निशाणा असल्याचं मानलं जात आहे. 'द कश्मीर फाइल्स'ला सपोर्ट करण्याची लोकं बॉलिवूड सेलिब्रिटींकडून मागणी करत असताना स्वरा भास्करचं हे ट्विट समोर आलं आहे. त्याचबरोबर या ट्विटने स्वराला युझर्सने चांगलच झापलं आहे आणि ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोलही होत आहे.