मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन प्रमाणेच त्यांची मुलगी आराध्या देखील खूप लोकप्रिय आहे. ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. आराध्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. ही शाळा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची आहे. या शाळेत करिश्मा कपूरसह अनेक सेलिब्रिटींची मुले शिक्षण घेण्यासाठी येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


करिश्मा कपूरला दोन मुले आहेत. तिचा मुलगा कियान हा आराध्या बच्चनसोबत धीरूभाई अंबानी यांच्या शाळेत शिकतो.



चंकी पांडेची छोटी मुलगी आणि अनन्या पांडेची बहीण रायसा पांडेही धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये शिकते.




हृतिक रोशन आणि सुजैन खान यांची दोन्ही मुलं, म्हणजेच रेहान आणि रिदान हे देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत.




अनेक सेलिब्रिटींची मुलं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिकलेली आहेत. यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहानाचा ही समावेश आहे.



सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान देखील याच शाळेत शिकले आहेत.



दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांनीही धीरूभाई अंबानी स्कूलमधून शिक्षण पुर्ण केलं आहे.





उत्तम सेक्यूरिटी आणि सर्व सुविधा असलेलं शिक्षण या सेलिब्रिटी किड्सचा घडवायला मदत करणार असतं. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या शाळेत मुलांना शालेय शिक्षणसाठी पाठवताना दिसतात.