मुंबई : फोटोत हा लहान मुलगा आज मोठा होऊन बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता बनला आहे. फोटोत हा अभिनेता खोडकर आणि सुंदर दिसत आहे. आज हा अभिनेता त्याची मस्ती, त्याच्यात असलेली एनर्जी आणि स्टाइलसाठी ओळखला जातो. बॉलीवूडची टॉप अभिनेत्री त्याची पत्नी आहे. हा बॉलिवूडचा एक मोठा स्टाइल आयकॉन आहे. अलीकडे तो त्याच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. 
 
जर तुम्ही अद्याप या मुलाला ओळखले नसेल, तर हा फोटो अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) लहानपणीचा फोटो आहे. रणवीरचा जन्म मुंबईत झाला. त्याला लहानपणापासून अभिनेता व्हायचं होतं, पण महाविद्यालयीन काळात त्यांना अभिनयाचा विचार सोडला आणि त्याच्या लेखनावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केला. इंडियाना युनिव्हर्सिटी, ब्लूमिंग्टन येथून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेऊन तो भारतात आला आणि ऑडिशन देऊ लागला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2010 मध्ये, रणवीरनं यशराज फिल्म्सच्या 'बँड बाजा बारात' चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि मुख्य भूमिकेसाठी त्याची निवड झाली. रणवीरनं या चित्रपटात दिल्लीत राहणाऱ्या बिट्टूची भूमिका साकारली होती. 'बँड बाजा बारात' प्रदर्शित झाल्यानंतर हिट झाला आणि रणवीरला सर्वोत्कृष्ट डेब्यू अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 2022 साली त्याला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यावा एकापाठोपाठ एक चित्रपट मिळाले आणि आज तो बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रणवीर लवकरच आलिया भट्टसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. 


रणवीरनं काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक न्यूड फोटो शेअर केला. या फोटोमुळे समाजाच्या सर्व स्तरांतून त्याच्यावर टीका करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेनं रणवीरविरोधात थेट पोलिसांत धाव घेतली. हा फोटो मासिकासाठी काढण्यात आला असून, त्याची विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे मिळविण्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे समाजातील तरुण नीतिभ्रष्ट करण्याचा किंवा समाज बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. अशा कृत्यामुळं महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होत असून रणवीरविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अर्जाद्वारे या संस्थेने चेंबूर पोलिस ठाण्यात केली होती.