मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रियक अभिनेता आणि अभिनेत्री लहानपणी कसे दिसायचे याची चाहत्यांना कायम उत्सुकता असते. सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरुये. या ट्रेंण्डमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करतात आणि चाहत्यांना ओळखण्याचं चॅलेंज देतात. असाच एका सेलिब्रिटीच्या बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे त्यांच्या काळातील रोमँटिक कपल होतं. चित्रपटात काम करत असताना दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1980 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते. या भव्य लग्नाची बी-टाऊनमध्ये चर्चा होती. 


दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केलं.  
अशा परिस्थितीत ऋषी आणि नीतू कपूर यांच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील दिसत आहे. जी त्यावेळी खूपच लहान होती. आता लोकांना फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री ओळखण्याचे आव्हान देण्यात आलं आहे.


फोटोमध्ये ही मुलगी सुंदर स्माईल देताना दिसत आहे.  ही मुलगी आजच्या काळात बॉलीवूडची नंबर वन अभिनेत्री आहे आणि 90 च्या दशकात चित्रपटांमध्ये वर्चस्व गाजवायची. या फोटोमध्ये ऋषी आणि नीतू कपूर स्टेजवर दिसत आहेत आणि त्यांच्यासमोर एक छोटी मुलगी हातात पुष्पगुच्छ घेऊन उभी आहे.  


तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की फोटोत दिसणारी निरागस मुलगी दुसरी कोणी नसून रवीना टंडन आहे.  रवीना ही ९० च्या दशकातील टॉप हिरोईन होती. आजही रवीना एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.