मुंबई : सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन लहान मुली दिसत आहेत. फोटोमध्ये दिसत आहे की, एका मुलीने दुसऱ्या मुलीला पाठीवर घेतलं आहे. पाठीवर बसलेल्या मुलीचे दात तुटले आहेत. ही सुंदर मुलगी आता बॉलिवूडच्या सर्वात स्टायलिश अभिनेत्रीपैकी एक आहे. जिचा चाहतावर्ग लाखोंमध्ये आहे.  स्टाईल आणि ग्लॅमरच्या बाबतीत या  अभिनेत्रींनी मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे सोडलं आहे. लोकं तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या बालपणीचे फोटो पाहून अनेकजण तिला ओळखतायेत, तर अनेकांना अजूनही तिला ओळखता आलेलं नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर अजूनही तुम्हाला या  लहान मुलीला ओळखता आलं नसेल तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की, ही अभिनेत्री आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. ज्या मुलीच्या पाठीवर ती बसली आहे. तीही आजच्या काळात मोठी अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आहे अनन्या पांडे. जी चंकी पांडेची लाडकी कन्या आहे. मोठं झाल्यानंतरही या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. अनन्या रोज सोशल मीडियावर सुहानासोबतचे फोटो शेअर करत असते आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असते. अनन्या आणि सुहाना दोघी एकाच शाळेत शिकल्या आहेत.



अनन्या पांडेने अनेक चित्रपट केले आहेत. नुकतीच ती दीपिका पदुकोणसोबत 'गहराइयां'मध्ये दिसली होती. त्याचबरोबर सुहाना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्यासोबत झोया अख्तरच्या द आर्चीजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या चित्रपटापूर्वीच सुहाना तिच्या सौंदर्य आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. ती सर्वात लोकप्रिय स्टार किडपैकी एक आहे.