मुंबई : अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. अनेक मॉडेल्स आणि एक्ट्रेसला हाताला काम नसलं तरी सोशल मीडियामुळे त्या कायम चर्चेत असतात. सांगायचं झालं तर अमिषा पटेल चित्रपटात दिसत नसली तरी ती सोशल मीडियामुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट आणि मादक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र यामध्येच काही बॉलिवूड आणि मराठी अभिनेत्री देखील आहेत ज्या त्यांना टक्कर देतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र यामध्ये आता आणखी एका मराठी अभिनेत्रीच नाव आपल्या ऍड करावं लागेल. त्या अभिनेत्रीच नाव आहे अक्षया गुरव. 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेली मराठमोळी अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया गुरवने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.


अक्षयाने नुकतंच बोल्ड फोटोशूट केलं आहे. फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलं आहे. मेसी बन आणि साजेसा मेकअप करत अक्षयाने ग्लॅमरस लूक केल्याचं दिसत आहे. अक्षयाने शर्टचं बटण उघड ठेवत फोटोशूटसाठी हॉट पोझ दिली आहे. परंतु, अक्षयाचा हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं नसल्याचं दिसत आहे. मराठमोळ्या अक्षयाने केलेल्या या बोल्ड फोटोशूटमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.


अनेकांनी तिच्या या फोटोवर संतप्त कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत ''तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जेव्हा कलाकरांना काम मिळत नाही, तेव्हा ते शरीर प्रदर्शन करुन चर्चेत येण्याचा व काम मिळवण्याचा प्रयत्न करतात'',असं म्हटलं आहे.



तर दुसऱ्याने ''अक्षया शरीर प्रदर्शन ही फॅशन नसून विकृती आहे. जी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यात आज तुही योगदान दिलं आहेस”, अशी कमेंट केली आहे. अक्षयाने केलेल्या बोल्ड फोटोशूट चाहते नाराज आहेत. फॉलोवर्स वाढवण्यासाठी असं फोटोशूट केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर कित्येकांनी अक्षयाच्या या फोटोवर कमेंट करत तिला अनफॉलो करणार असल्याचंही म्हटलं आहे.