This marathi actress is a Relative Of Rahul Dravid know in detail : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदिती द्रविड ही तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. अदिती ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच अदितीनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदिती द्रविडनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अदितनं गुलाबी रंगाचं टॉप परिधान केलं असून तिच्या शेजारी राहुल द्रविड उभं असल्याचं पाहायला मिळाला आहे. हा फोटो शेअर करत अदितीनं 'द्रविड्स' असं कॅप्शन देखील दिलं आहे. आता तिनं राहुल द्रविडसोबत पोस्ट हा शेअर केली असा प्रश्न तुम्हाला असेल अनेकांनी प्रश्न केला आहे की तुमची आडनावं ही सारखी आहेत तर तुम्ही एकमेकांचे नातेवाईक आहात का? अदितीनं मात्र, सध्या यावर काही म्हटलेलं नसलं तरी, या आधी एकदा तिनं तिच्या आणि राहुल द्रविडचं काय नातं आहे याविषयी सांगितलं होतं. 


काय आहे अदिती आणि राहुलचं नातं? 


अदिती आणि राहुल द्रविड हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. राहुल द्रविड हा अदितीचा चुलत काका आहे. स्वत: अदितीनं हा खुलासा केला होता. पण अनेकांना ही गोष्ट माहित नाही. त्यामुळे ते सोशल मीडियावर कमेंट करून तिला हाच प्रश्न विचारत आहेत. 


हेही वाचा : लाहोरमध्ये 'हा' माणूस जन्मला नसता तर कधी स्टार बनले नसते अमिताभ बच्चन, शाहरुख खान!


अदितीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं आजवर अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. कारण या चित्रपटातील मंगळागौर हे गाणं अदितीनं लिहिलेलं आहे. तिच्या या गाण्याचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. अदिती ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.