मुंबई : बॉलिवूडमध्ये जिथे लग्नाची गडबड सुरू आहे तिथे मराठी सिनेसृष्टीत एक गोड बातमी मिळणार आहे. एका अभिनेत्रीच्या घरी एक लहान पाहुणा येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी घरातील मंडळी आणि मराठीतील सर्व सिनेकलाकार आतुर आहेत. हे आगमन होणार आहे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच क्रांती रेडकरच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत क्रांती रेडकर अतिशय सुंदर दिसत आहे. 



क्रांतीने २०१७ साली समीर वानखेडेशी लग्न केलं. या दोघांनीही अगदी साध्या आणि गुपचूप पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर आता क्रांती आई होणार असल्यामुळे रेडकर आणि वानखेडे दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पसरल्याचं सांगण्यात येत आहे.



क्रांती रेडकरने आतापर्यंत तिच्या नवऱ्याचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. समीर वानखेडे हे देशसेवेत कार्यरत असल्यामुळे त्यांची ओळख गुलदस्त्यातच आहे. त्याचप्रमाणे आता तिची गोड बातमी देखील लपवण्यात आली आहे.