`या` मराठमोळ्या अभिनेत्रीला मासिक पाळी येताच वडिलांनी ठेवली पार्टी!
Actress on Her First Period : या अभिनेत्रीला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली... तेव्हा आई जवळ नव्हती आणि वडिलांनी ठेवली होती पार्टी..
Actress on Her First Period : आज देखील असे अनेक लोकं आहेत जे पीरियेड्सविषयी बोलत नाहीत. जेव्हा मुलींना मासिकपाळी येते तेव्हा त्यांच्यावर अनेक बंधनं लावण्यात येतात. पण समाजात काही असे लोक आहेत ज्यांच्या मुलींना मासिक पाळी आली की त्यांना आनंद होतो. ते त्यांच्यावर कोणती बंधनं घालत नाहीत तर ते या सगळ्याला सेलिब्रेट करतात. तर त्याचं एक सुंदर उदाहरण एक मराठमोळी अभिनेत्री आणि तिचं कुटुंब आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री भूमि पेडनेकरनं 'गर्ल्स बज'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या पहिल्या मासिक पाळीविषयी सांगितलं. भूमिनं सांगितलं की "जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती तेव्हा माझी आई घरी नव्हती. माझं वडील घरी होते. मी मोठ्या मोठ्यानं ओरडू लागले, मला कळत नव्हतं की इतका त्रास का होतोय. मला असं वाटत होतं की माझं संपूर्ण आयुष्य हे संपल. तेव्हा माझ्या वडिलांनी मला शांत केलं, माझ्यासाठी सॅनिटर नॅपकिन घेऊन आले आणि मला सगळं काही समजवलं."
भूमिनं पुढे सांगितलं की "त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी पार्टी ठेवली होती. कारण त्यांना वाटतं होतं की हा क्षण माझ्या लेकीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. मला अजूनही आठवण आहे की जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती तेव्हा मला संपूर्ण शरीर हे दुखत होतं. त्याचं कारण म्हणजे त्यावेळी तुमच्या शरिरात खूप बदल होत होते आणि तुम्हाला कळत नाही की तुमच्यासोबत काय होतंय. अशात माझे वडील माझे पाय दाबायचे. जेव्हा तुमच्या आयुष्यात असे पुरुष असतात तेव्हा तुमचं आयुष्य हे खूप सुंदर आणि सोपं होतं."
भुमिनं एका मुलाखतीत सांगितलं की "तिनं तिचं शिक्षण संपवल्यानंतर अभिनय शिकण्यासाठी व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन घेतलं होतं. तर तिचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी तिच्या वडिलांनी 13 लाख रुपये लोन घेतलं होतं. तर तिचं अटेंडेंस पूर्ण नसल्यानं तिला कॉलेज ड्रॉप करावं लागलं आणि अशात तिच्यावर 13 लाख रुपयांचं लोन तर होतंच. या चिंतेत तिला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तिनं YRF साठी कास्टिंग डायरेक्टरचं काम करणं सुरु केलं. त्यासाठी तिला पहिला पगार हा 7 हजार रुपये मिळाला होता. त्यावेळी भुमिनं बॅन्ड बाजा बारात या चित्रपटासाठी रणवीर सिंग, अनुष्का शर्मापासून अनेक कलाकारांचं ऑडिशन घेतलं होतं."