नवी दिल्ली : ‘स्प्लिट्सविला’ सीझन ८ मध्ये दिसलेला गौरव अरोरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दिल्लीचा गौरव आता आधीसारखा दिसत नाही. म्हणजे तो आता गौरव राहिला नसून गौरी अरोरा बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरवने सेक्स चेन्ज सर्जरी केली आहे. आता तो टीव्ही या नव्या ओळखीसह येण्यास तयार झाला आहे. गौरव ऊर्फ गौरी अरोराने सोशल मीडियात तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये गौरव एका नव्या रूपात बघायला मिळत आहे. त्याने सोशल मीडियातही चाहत्यांना सांगितले की, मला गौरी म्हणा.



‘स्प्लिटविला’ मध्ये गौरवला पाहून तरूणी त्याच्यावर जीव ओवाळायच्या. मॉडलिंगच्या दुनियेत तो चांगलं काम करत होता. कुणीही विचारही केला नसेल की तो सेक्स चेन्ज करेल. मीडिया रिपोर्टनुसार, यावर गौरवचं म्हणनं आहे की, त्याला आयुष्यभर एक महिला असल्याचं जाणवत राहिलं. त्यामुळे त्याला हा निर्णय घेणे गरजेचे होते. 




सर्जरी करून गौरवने त्याच्या चेहरा एका सुंदर महिलेच्या चेह-यात परावर्तीत केलाय. अनेक प्रकारचे लेझर ट्रीटमेंट आणि सर्जरी करून त्याने हा लूक मिळवला आहे. आता जेव्हा ही प्रोसेस पूर्ण झालीये. तो गौरवचा गौरी झालाय. 



तो आता लवकरच टीव्ही नव्याने एन्ट्री घेणार आहे. त्याला इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल सीझन ३ मध्ये स्पर्धक म्हणून निवडण्यात आलंय. या शोमध्ये डब्बू रतनानी, मलाईका अरोरा आणि मिलिंद सोमण जज असतील.