मुंबई : अभिनेता आणि विनेदवीर अशी दुहेरी ओळख असणाऱ्या कपिल शर्मा (Kapil Sharma)याच्या लोकप्रियतेचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. आपल्या अनोख्या विनोदशैलीच्या बळावर कपिलनं हे नाव, ही प्रसिद्धी कमवली आहे. पण, त्याचा हा प्रवास फारसा सोपाही नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलला इथवर आणण्यासाठी काही खास व्यक्तींचा मोलाचा वाटा. कुटुंबाची त्याच महत्त्वाची भूमिका तर होतीच पण, सोबतच कुटुंबाबाहेरील एका व्यक्तीनंही त्याला बरीच मदत केली. 


खुद्द कपिलनंच यासंदर्भातील खुलासा करत त्या व्यक्तीचं नाव सर्वांसमोर आणलं. 


आपल्या यशामध्ये अभिनेत्री अर्चना पूरण सिंगनं फार मोठी मदत केली असं त्यानं स्पष्ट केलं. 


कपिल आणि अर्चना कायमच एकमेकांची थट्टामस्करी करताना दिसतात. पण, एक गोष्ट आहे की अर्चनानं कपिलला संघर्षाच्या दिवसात मदत केली नसती तर.... 


...तर आज कपिल ज्या टप्प्यावर आहे किंबहुना तो तिथं पोहोचला नसता. 


एका मुलाखतीत कपिलनं याचा खुलासा केला. 'मला लोकप्रिय सेलिब्रिटी करण्याच अर्चना यांचा मोलाचा वाटा आहे. 


त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला कायम पाठिंबा देत राहिल्या, माझी प्रशंसा करत राहिल्या. एका कलाकाराला याहून आणखी काय हवं. 


माझं मानसिक धैर्य वाढत गेलं. आमच्या नात्यात कोणतीही औपचारिकता नाही. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि म्हणूनच एकमेकांशी खेळीमेळीनं वागत असतो', असं कपिल म्हणाला.