मुंबई : आतापर्यंत सगळ्यांनी जेठालाल, मेहता साहेब, दयाबेन, पोपटलाल टप्पू सेना, बाघा, बावरी, भिडे, रोशन भाभी म्हणजेच तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रत्येक पात्राला भेटला आहात. त्यांना दररोज पाहता आणि त्यांची भूमिका एन्जॉय करता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सब टीव्हीच्या या हिट शोमध्ये एक पात्र देखील आहे, ज्याचा शोमध्ये खूप वेळा उल्लेख केला जातो पण हे पात्र कधीच दिसत नाही. हे विचित्र आहे की गेल्या 14 वर्षांत, त्या पात्राचा उल्लेख जवळजवळ प्रत्येक भागामध्ये केला गेला होता, पण ते पात्र कधीही शोमध्ये दिसले नाही. 


हे पात्र कधीच शोमध्ये दिसले नाही, काहींच्या लक्षात आले असेल, तर तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दयाबेनची आई म्हणजेच जेठालालच्या सासूचा उल्लेख अनेकदा केला आहे.


होय, तीच आई जी दयाबेनशी तासंतास गप्पा मारते, जेठालालचे विचित्र नाव ठेवते, जी गोकुळधाम मधील प्रत्येक समस्येवर काहीतरी मार्ग नक्कीच पाहते, पण दयाबेनची आई कुठे आहे? आजपर्यंत त्यांचे नाव शोमध्ये खूप ऐकले होते पण ते कधीच दिसले नाही. दयाबेनच्या आईवर स्पेशल एपिसोडही बनवले गेले पण तरीही त्यांचा चेहरा कोणालाच दिसत नव्हता.


तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक लोकप्रिय शो आहे. ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. यामुळेच शोमधील प्रत्येक पात्राशी त्याचा संबंध जाणवतो. हेच कारण आहे की चाहते देखील गेल्या 4 वर्षांपासून दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत, पण आजपर्यंत ती शोमध्ये दिसली नाही. 


त्यामुळे शोमध्ये आणखी दोन महत्त्वाच्या पात्रांचा अभिनय कमी झाला आहे, ते म्हणजे दयाबेनची आई आणि दयाबेन. तसंच दयाबेनची वीरा सुंदरलालही बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये दिसलेली नाही.