Jhalak Dikh La Ja: डान्सिंग रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' (Jhalak Dikh La Ja) हा शो पुन्हा परतला असून सगळ्यांनाच या शोची आतुरता लागून राहिली होती. हा शो पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. शोचा हा दहावा सीझन आहे ज्यात एकापेक्षा जास्त स्टार्सनी सहभाग घेतला आहे. (this popular television actor leaves jhalak dikh la ja show see what is the reason)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा शो इतका रंगला होता की या शोमधले कलाकारही फार उत्साहानं डान्स करत होते. परंतु चांगल्या सुरू असलेल्या या शोमध्ये आता एका कलाकरानं स्वतःहून डच्चू घेतला आहे. 'कुंडली भाग्य' (Kundali Bhagya Actor Dheeraj Dhoopar) फेम धीरज धूपरने तीन आठवड्यांनंतर शोला अलविदा केलं आहे. 


आणखी वाचा : केसांतील उवा काही केल्या जात नाहीयेत? करा 'हे' घरगुती उपाय


अशा प्रकारे अचानक धीरज शोमधून बाहेर पडल्याने त्याचे चाहतेही निराश झाले आहेत. अभिनेत्याने अचानक शो मध्येच का सोडला हे कोणालाही समजले नाही.


धीरज धूपर 'झलक दिखला जा 10'च्या चौथ्या पर्वाच्या शूटिंगसाठी पोहोचला नव्हता किंवा तो सरावही करत नव्हता. व्हिडीओ मेसेजद्वारे त्यानं टीमला आपल्या तब्येतीची माहिती दिली. त्याचवेळी धीरजला 'झलक दिखला जा' आणि 'शेरदील शेरगिल' एकाच वेळी शूट करता आले नाही, असेही बोलले जात आहे. मात्र, धीरज (Dheeraj Dhoopar Health Issues) आणि शोच्या निर्मात्यांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. 


आणखी वाचा : Amir Khan च्या जावयाचं Nude Photoshoot पाहून तुम्हीही कराल डोळे बंद


वृत्तांवर विश्वास ठेवला तर धीरज धूपर या दोन्ही शोच्या शूटिंगनंतर कुटुंबाला वेळ देऊ शकला नव्हता. त्याला पत्नी आणि मुलासोबत वेळ घालवायचा होता. त्याचबरोबर त्यांची प्रकृतीही ठीक नाही. गेल्या आठवड्यात एका टास्कदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो सध्या बेड रेस्टवर आहे. 



'झलक दिखला जा'च्या या सीझनला करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही जज करत आहेत. तसेच मनीष पॉल हा शो होस्ट करत आहे. अली असगर हा शोमधून पहिला अलिमिनेट झालेला स्पर्धक आहे आणि अलीकडेच अॅथलीट दुती चंदनं (Dhooti Chand) वाइल्ड कार्ड एंट्री घेतली आहे.