`पुष्पा 2: द रुल` मधील हा एकच सीन कमावून देणार 2000 कोटी, VIDEO VIRAL
Pushpa 2 Viral Scene : `पुष्पा 2` चित्रपटातील त्या एका सीनची सगळीकडे चर्चा
Pushpa 2 Viral Scene : 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट काल 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शित होताच सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आहे. चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती तेव्हापासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत होती. त्यावरून एक अंदाज लावण्यात आला होता की हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक किती गर्दी करु शकतात. दरम्यान, चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना चित्रपटातील डायलॉग्स, सीन आणि प्रत्येक अॅक्शनची भुरळ पडली आहे. या चित्रपटात एक असा सीन आहे ज्यानं, या चित्रपटाला तब्बल 2000 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन करुन देण्यासाठी मदत करु शकतो असं म्हटलं जातं.
'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपटाला पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना यातील एका एका सीन आणि डायलॉगसाठी वेड लावलं आहे. चित्रपटातील एक सीन जो सगळ्यांचं मन जिंकतोय. तो कोणता आता तुम्हालाही जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. तो सीन म्हणजे ज्यात अल्लू अर्जुननं साडी नेसली आहे. त्याशिवाय त्या साडीतच त्याच्या स्टाईलमध्ये तो अॅक्शन करताना दिसत आहे. त्याची स्टाईल आणि स्वॅगनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या सीनचे थिएटरमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हा सीन सुरु होताच प्रेक्षक हे शीट वाजवताना दिसत आहेत, तर काही प्रेक्षक ओरडताना दिसत आहेत.
हेही वाचा : सुपस्टार ते बिझनेसमन 7 वेळा अफेयरच्या चर्चा! 43 व्या वर्षी अविवाहीत असणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
एक नेटकरी फोटो शेअर करत म्हणाला, 'मी आजवर इतका भारी चित्रपट कधी पाहिलाच नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'फर्स्ट हाफ आणि सेकेंड हाफमध्ये सगळ्यात जास्त चांगला कोणता सीन असेल तर तो हा आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पुष्पा 2: द रुल' मधील सगळ्यात जास्त आवडलेला हा सीन आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'माझा शब्द आहे. या एका सीनमुळे हा चित्रपट नक्कीच 2000 कोटींचं कलेक्शन करणार आहे. मी ज्या थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला तिथे सगळेच वेडे झाले होते. अल्लु अर्जुननं सगळ्यांचे लक्ष वेधले.' दरम्यान, पुष्पा चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 165 कोटींचं कलेक्शन केलं आहे.