मुंबई : झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाने २०१९ हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलं. थेट ऑस्करच्या शर्यतीपर्यंत मजल मारणाऱ्या या चित्रपटाने विविध कारणांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातीलच एक कारण म्हणजे या चित्रपटातील संवाद. अस्सल बम्बईया भाषेचा बाज या चित्रपटातून पाहायला मिळाला असं अनेकांचं मत. पण, यामध्ये मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचीच जास्त झलक असल्याचं चित्रपटाचे संवाद लिहिणाऱ्या विजय मौर्य यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठेही जा मानखुर्द, कन्नमवार नगर, करिरोड, कॉटनग्रीन, मालवणी अशा ठिकाणी गेलं असता तिथे रिक्षावाल्यांच्या ट्रॉफिकपासून भोतपर्यंतच्या अनेक शब्दांचे बारकावे नेमके कसे आहेत, हे विजयने 'झी २४तास'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 
'क्या कर रेले है भावा.....' ही अशी भाषा 'गली बॉय'ची दिग्दर्शिका झोया अख्तर हिला नको हवी होती. सोबकतच चित्रपटामध्ये तिला शिवीगाळही टाळायचा होता. सर्वजण बोलतात त्याच भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यावरस तिचा जोर होता. त्याच धर्तीवर 'गली बॉय'मधील संवाद लिहिले गेले. 


रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटातील सर्वाधिक गाजलेला डायलॉग म्हणजे,  'मेरे बॉयफ्रेंडे गुलूगुलू करेगी तो धोपटूंगीही ना'. या संवादाची कल्पना नेमकी कशी सुचली हे सांगता विजय मौर्य म्हणाला, 'धोपटूंगी हा तर मराठी शब्द. आमचे शेजारी होते, आताही आहेत. त्यांच्याकडून मी बालपणी हा शब्द खुप ऐकला होता. अभ्यास नाही केला तर धोपटेन हा तुला, वगैरे हेसुद्धा मी ऐकलेलं. आता मुळात हा चित्रपट धारावीमध्ये घडला. इथे विविध भाषा, प्रांताची लोकं राहतात. त्यातही आलियाने साकारलेली सफीना तिच्या भागात विविध भाषा ऐकून त्याचा तिच्यावर प्रभावही असणं अपेक्षित आहे. त्याच आधारे धोपटूंगीना या शब्दाचा वापर डायलॉगमध्ये करण्यात आला.'



पाहा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ


गुलूगुलू या शब्दाचं म्हणावं तर ओडिया, मराठी आणि अशा भाषांमध्ये या शब्दाचा होणारा वापर पाहता,  'मेरे बॉयफ्रेंडे गुलूगुलू करेगी तो घोपूंगी ही ना तेरेको' असा डायलॉग लिहिला. एकिकडे 'सफीना'ची अशी भाषा असतानाच या चित्रपटामध्ये 'आप' या आदरार्थी शब्दाचा उल्लेख करत बोलणारे तिचे आईवडिल आहेत. तर त्याचवेळी रणवीरने साकारलेला 'मुराद' आणि त्याच्या मित्रमंडळींमध्ये बोलली जाणारी भाषा असं बरंच वेगळेपण लेखकाने चित्रपटाचं संवादलेखन करतेवेळी सांभाळलं आहे.