मुंबई : पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत सामाविष्ट झालेल्या 'वॉर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास ५३ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला होता. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २० ते २१ कोटी रूपायांचा गल्ला जमा केला आहे. तर पहिल्या दिवशीच्या कमाईवरून चित्रपटाचा कमाईचा आकडा कमी होताना दिसत आहे. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 'वॉर' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफची जुगलबंदी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी हृतिकचा शिष्य असलेला टायगर कशा प्रकारे आपल्या गुरूंच्या म्हणजेच हृतिकच्या विरेधात उभा राहतो. 'कलंक', 'साहो', 'मिशन मंगल', 'भारत' या चित्रपटांचा विक्रम मोडत 'वॉर' चित्रपट पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत सामाविष्ट झाला आहे.     


'वॉर' चित्रपट जवळपास ३ हजार ८०० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'खालीद कभी मेरा स्टूडंट हुआ करता था, अब उसे लगता हैं की वो अपने टिचर से आगे चला गया हैं...' अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' येत्या काळात किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.