मुंबई : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आमीर खानचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा आपल्या कथेमुळे अगदी सुरूवातीपासूनच चर्चेत होता. भारत स्वातंत्र्य होण्याअगोदरच्या ठग लोकांची गोष्ट या सिनेमात आहे. आमीर खानच्या रिसर्च टीमने आणि त्याने खूप तयारी केली होती. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सगल 3 दिवस टॉप ट्रेडिंगमध्ये होता. 200 करोड रुपये खर्च झालेला हा पहिला हिंदी सिनेमा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मात्र चित्र वेगळंच आहे. हा सिनेमा गुरूवारी प्रदर्शित झाला. हा कॉमेडी सिनेमा नसला तरीही प्रेक्षकांना हसवण्यात हा सिनेमा खूप यशस्वी ठरला आहे. प्रेक्षकांनी यावर मेम्स करून आणि नवनवे व्हिडिओ करून शेअर करायला सुरूवात केली आहे. पाहा यातीलच काही खास व्हिडिओ 



अमिताभ बच्चन देखील यात अडकले


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा देखील सहभाग आहे. या जोक्स, मीम्स आणि व्हिडिओत फक्त मिस्टर परफेक्शनिस्टच नाही तर बिग ही देखील आहे. एवढंच काय तर कतरिना कैफवर देखील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. अमिताभ बच्चन देखील यात अडकले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओ बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा देखील सहभाग आहे. या जोक्स, मीम्स आणि व्हिडिओत फक्त मिस्टर परफेक्शनिस्टच नाही तर बिग ही देखील आहे.



एवढंच काय तर कतरिना कैफवर देखील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. या सिनेमाची कितीही खिल्ली उडवली जात असली तरीही एक गोष्ट नाकारता येणार नाही. आमीर - अमिताभ असे स्टारर असलेले हा सिनेमा या वर्षातील सगळ्यात उत्कृष्ठ ओपनिंग कलेक्शन करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने अगदी पहिल्याच दिवशी 52.25 करोड रुपयांची कमाई केली आहे.



या ना त्याकारणाने हा सिनेमा चर्चेत आहे. आणि याचा फायदा ठग्स ऑफ हिंदुस्तान या टीमला नक्की होत आहे.