मुंबई : यशराज बॅनर अंतर्गत अमिताभ बच्चन आणि आमीर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 8 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं तिकिट बाकीच्या सिनेमाच्या तिकिटांपेक्षा 10 टक्के जास्त असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आता जास्त रुपये देऊन हा सिनेमा पाहावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्ममेकर या सिनेमाचं वेगळं प्लानिंग करत आहे. या सिनेमाचं तिकिटं हे संजू या सिनेमाच्या तिकिटापेक्षा अधिक असणार आहे. मुंबईतील पीवीआर आणि INOX मध्ये संजू सिनेमाचं तिकिट 1800 रुपये होते. तर सामान्य सिनेमाचं तिकिट हे 600 रुपये असतं. त्यामुळे आता ठग्स ऑफ हिंदोस्तान या सिनेमाचं तिकिट देखील आता वाढणार आहे. 


दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांचा हा सिनेमा अॅक्शनवर आधारित आहे. तर अमिताभ बच्चन ठगचे सरदार खुदाबख्शच्या रोलमध्ये आहे. तर सिनेमाचं नाव आझाद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अमिताभ आणि आमिर खान लढतात. अमिताभ बच्चन ट्रेलरमध्ये तलवरबाजी करताना दिसत आहे. या सिनेमात दिग्गज व्यक्तींसोबत कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख देखील लीड रोलमध्ये आहेत.