मुंबई : Tiger Shroff's girlfriend, Tiger is back in love : अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ यांचे ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. मात्र, आता टायगर पुन्हा प्रेमात पडल्याचे वृत्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिशा पटानी हिच्यासोबतच्या ब्रेकअपच्या वृत्तानंतर टायगरचे नाव आता एका नव्या अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्री आकांक्षा शर्मा  (Akanksha Sharma) आणि टायगर हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. 


दरम्यान, टायगरची नवी गर्लफ्रेंड कोण, कशी दिसते याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पण ही आकांक्षा (Akanksha Sharma) कोण आहे? याबाबत सर्च करण्यात येत आहे. 



टायगर - आकांक्षा डेटिंगवर



टायगर श्रॉफ आणि आकांक्षा शर्मा यांनी म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. पहिल्या म्युझिक व्हिडिओचे नाव ‘कॅसानोव्हा’ आणि दुसऱ्याचे नाव ‘आय एम अ डिस्को डान्सर 2.0’ अशी नावे आहेत. या दोन्ही गाण्यांमध्ये टायगरची आकांक्षासोबतची चांगली केमिस्ट्री जुळली. आता असा दावा केला जात आहे की, या दोन गाण्यांच्या शूटिंगदरम्यान टायगर आणि आकांक्षा एकमेकांच्या जवळ आले आहेत. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. टायगर पुन्हा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.