टायगर श्रॉफचा नवा डान्स व्हिडिओ व्हायरल...
बॉडी आणि अॅक्शन शिवाय टायगर श्रॉफ त्याच्या डान्समुळे प्रसिद्ध आहे.
मुंबई : बॉडी आणि अॅक्शन शिवाय टायगर श्रॉफ त्याच्या डान्समुळे प्रसिद्ध आहे. त्याचे डान्स मुव्ज जबरदस्त असतात. बागी सिनेमात टायगरचा अभिनय आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली. सध्या तो करण जोहरच्या स्टूडेंट ऑफ द ईयर 2 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या टायगरने एक जबरदस्त डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यातील त्याचे डान्स मुव्ज पाहुन तुम्ही त्याच्या डान्सिंगचे फॅन व्हाल...
टायगरने २०१४ मध्ये हिरोपंती या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर आलेल्या बागी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता सध्या टायगर श्रॉफ स्टूडेंट ऑफ द ईयर 2 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात सिनेमात अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा २३ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. पहा- आता इतक्या मोठ्या घरात राहणार टायगर श्रॉफ...