Koffee With Karan 7: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' या कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. प्रत्येक आठवड्याला नव्या सेलिब्रिटींसह नवनवे खुलासे या कार्यक्रमात समोर येतात. त्यामुळे बॉलिवूडची दुसरी बाजू जगासमोर येत आहे. कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना करण जोहर सीक्रेट प्रश्न विचारतो आणि उत्तर देण्यास भाग पाडतो. कार्यक्रमाच्या या भागात बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांनी भाग घेतला. यावेळी करण जोहरने रॅपिड फायर राउंडमध्ये दोघांनं बोलतं केलं. टायगर आणि क्रितीने 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. लवकरच ही जोडी 'गणपत' चित्रपटात एकत्र दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॅपिड फायर राउंडमध्ये करणने टायगरला विचारले की, 'कोणत्या वियर्ड ठिकाणी, तू कुठे मेकआउट केलं आहेस?' या प्रश्नावर हँडसम हंक टायगर श्रॉफ याने सांगितलं की, 'हवेत. पण हे वियर्ड नाही. ते बऱ्यापैकी साहसी होतं.'  टायगरच्या या धक्कादायक खुलाशानंतर होस्ट करण जोहर म्हणाला, 'माइल हाय क्लब? तुम्हीही त्याचे सदस्य आहात. शोनंतर यावर चर्चा करू.'


टायगरनंतर करण जोहरनेही खुलासा केला की, 'मीही मेकआउट करण्याचा प्रयत्न केला होता, पण टॉयलेट फार मोठे नव्हते. तेव्हा मी पकडलो गेलो. माझे नशीब पाहा. माझ्यासाठी मेसी सिनेरियो होता.'